मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ओडिया गायक मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन झालं. स्टेजवर परफॉर्मंस करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. ते रविवारी रात्री ओडिशातील जेपोर शहरात एका कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्स देत असताना ही दुःखद घटना घडली.
कोरापुट जिल्ह्यातील जेपोर शहरातील राजनगर येथे दुर्गापूजेसाठी आयोजित कार्यक्रमात महापात्रा गायन सादर करत होते. दोन गाणी गायल्यानंतर ते स्टेजवर एका खुर्चीवर बसले आणि इतर गायकांना ऐकत होते. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेताला. त्यांच्या जाण्यानं संगीतसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मुरली यांचा मोठा भाऊ विभूती प्रसाद महापात्रा यांनी सांगितलं की, ‘मुरलीला दीर्घकाळापासून हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होता’. मुरली महापात्रा यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. महापात्रा हे ओडिशातील प्रसिद्ध गायक होते. जयपूरमध्ये त्यांना अक्षय मोहंती या नावानं ओळखले जात होते. गायन कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ते जयपूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करायचे.