राज कुंद्राच्या कार्यालयातून अश्लील व्हिडीओ लंडनला पाठवले जायचे

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. याप्रकरणी आता अनेक नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी (24 जुलै) या प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीम अ‍ॅप कार्यालयावर छापे टाकले होते. यावेळी पोलिसांनी कार्यालयातील अनेक स्क्रिप्ट जप्त केल्या. पोलिसांना ज्या स्क्रिप्ट मिळाल्या आहेत त्याच्या आधारावर अश्लील चित्रपटांचे चित्रिकरण केलं जाणार होतं, अशीही माहिती समोर आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिप्टची लिपी हिदींमध्ये आहे. जवळपास सर्वच स्क्रिप्ट हिंदीत होत्या. त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर पुन्हा पॉर्न चित्रपट बनवण्याची तयारी केली जात होती. पण राज कुंद्राला बेड्या ठोकल्यानंतर सर्व स्क्रिप्ट ऑफिसमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे आता गुन्हे शाखेच्या रडारवर राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे संयुक्त बँकखाते देखील आहेत. या खात्याद्वारे अनेक परदेशी व्यवहार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज कुंद्राच्या कार्यालयातून लंडनला व्ही ट्रान्सफरमार्फत अश्लील व्हिडिओ पाठवण्याचे काम केले जायचे. कुंद्राचा माजी पीए आणि कन्नेरीन कंपनीचा भारताचा प्रतिनिधी उमेश कामत हे काम करायचा. तिथे व्हिडीओ पाठवण्यात आल्यानंतर ते व्हिडीओ हॉटशॉट्सवर अपलोड केले जायचे. व्हिडिओ पाठविल्यानंतर उमेश कामत ही माहिती राज कुंद्रापर्यंत पोहोचवत असे. कारण कन्नेरीन कंपनी ही प्रदीप बक्षी याच्या नावावर फक्त नावापुरता मर्यादित होती. ती कंपनी राज कुंद्राच पूर्णपणे हाताळायचा, असा दावा गुन्हे शाखेने केला आहे. या सर्व्हरच्या तपासणीत गुन्हे शाखेची टीम सायबर तज्ज्ञांचीही मदत घेत आहे. शिल्पा शेट्टीचा जप्त केलेला लॅपटॉप, आयपॅड गुन्हे शाखा कडून तपासले जात आहेत.

या प्रकरणात प्रॉपर्टी सेलने केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट नेमकं कसं चालायचं, याबाबतची माहिती राज कुंद्राच्या कार्यालयात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनी प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत.

शिल्पाने अटक केलेले आरोपी आणि कंपनीच्या कर्मचार्‍यांशी काही बातचित किंवा चॅट केला आहे का याची प्रॉपर्टी सेलला माहिती घ्यायची आहे. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखा आता याप्रकरणी शिल्पा शेट्टीच्या मोबाईलची देखील क्लोनिंग करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्हे शाखेला मिस्ट्री वॉलच्या कपाटातून काही अॅग्रीमेंट मिळाली आहेत. त्यामुळे गुन्हे शाखा शिल्पाची पुन्हा चौकशी करु शकते. तसेच शिल्पाच्या बँक खात्याची देखील चौकशी सुरु आहे. शिल्पाला कंपनीच्या खात्यातून किती पैसे मिळाले, शिल्पाच्या खात्यात किती पैसे गेले, याची चौकशी केली जाईल.

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गुन्हे शाखेने अभिनेत्री गेहना वशिष्ठ हिला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ती चौकशीसाठी हजर राहिली नाही. “सध्या मी मुंबईबाहेर आहे. मला काल रात्री मेसेज पाठवून बोलावले आहे. कोणतेही समन्स पाठवलेले नाही. त्यामुळे मी आज गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षासमोर येऊ शकणार नाही. पण मी तपासाला पूर्ण सहकार्य करणार”, असं गेहना म्हणाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.