‘अरे मी काय म्हातारा आहे का?’; पहिल्याच दिवशी का भडकले किरण माने?

कलर्स मराठीवर प्रदर्शित होणारा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ‘बिग बॉस मराठीच्या सीझन 4’ च्या सीझनला सुरुवात झाली. “ALL IS WELL” म्हणत काल बिग बॉस मराठीच्या घराचा दरवाजा उघडला आणि स्पर्धकांच्या नावांचाही पडदा उघडला. काल सदस्यांच्या नावांच्या चर्चेला पूर्वविराम लागत 16 सदस्यांची नाव समोर आली.

आजपासून 100 दिवस 16 सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या. प्रत्येक सदस्याला घरात प्रवेश करण्याआधीच त्यांची कामे बिग बॉसने ठरवून दिली. नुकताच एक प्रोमो समोर आला असून सदस्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले.

बिग बॉस यांनी जाहीर केले, प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी हे ठरवायचे आहे कि, कोणता खेळाडू निरुपयोगी आहे ? त्रिशूलचे म्हणणे पडले किरण माने. कारण आपण तरुण आहोत. त्यावर किरण माने म्हणतात ‘मी काय म्हातारा वाटलो की काय’. तर अपूर्वाने प्रसादचे नावं घेतले, ती असं देखील म्हणाली “मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये” आता पहिल्याच टास्कमध्ये फूल टू राडा होणार असल्याचं दिसत आहे. आता बघूया सदस्य कोणत्या खेळाडूला ठरवणार निरुपयोगी ?

दरम्यान, 2022 या वर्षात सगळ्यात जास्त वादग्रस्त राहिलेले कलाकार म्हणजे अभिनेते किरण माने. आता किरण माने बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरात सामील होताच किरण माने यांनी पोस्ट केली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.