कोरोना विषाणू संसर्गानंतर भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना काळात सॅनिटायझर, साबण आणि सफाईचं साहित्य मोठ्या प्रमाणावर विकलं जात आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा काही कंपन्यांना देखील फटका बसत आहे. देशातील साबण निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीला तब्बल 34 हजार 918 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
शेअर बाजारातील सेन्सेक्समधील टॉप टेनमधील 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे.गेल्या आठवड्यात 1 लाख 33 हजार 433.64 कोटी रुपयांची घसरण झालीय. यामध्ये सर्वाधिक फटका हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीला बसला आहे. हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीची मार्केट कॅप 34 हजार 918.58 कोटी रुपयांनी घसरुन 5 लाख 42 हजार 292 कोटींवर आली आहे.
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या मार्केट कॅपमध्ये देखील घसरण झाली आहे. टीसीएसची मार्केट कॅप 30,887.07 कोटी रुपयांनी घसरुन 11,50,331 कोटींवर आली आहे. टेलिकॉम क्षेत्रातील मोठी कंपनी भारती एअरटेलला देखील नुकसानाचा सामना करावा लागला. या दरम्यान कंपनीची मार्केट कॅप 10,270.09 कोटी रुपयांनी घसरुन 2,86,601.44 कोटी रुपयांवर आली.
बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मधील कंपनी एचडीएफसीची मार्केट कॅप 13,755.09 कोटींवरुन घसरुन 4,50,499.54 कोटी रुपयांवर आली. एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅप 7,800.58 कोटींच्या नुकसानानंतर 7,79,671.98 कोटी इतकी राहिली. रिलायन्स इडस्ट्रीजला देखील याचा फटका बसला. कंपनीला 18,764.75 कोटी रुपयांचं नुकसान झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 18,764.75 कोटी रुपयांनी घसरुन 12,07,283.32 कोटी रुपयांवर आली.
इन्फोसिसला फटका
इन्फोसिसची मार्केट कॅप 7,967.43 कोटी रुपयांनी घसरुन 5,68,308.25 रुपयांवर आली. कोटक महिंद्रा बँकेची मार्केट कॅफ 5,995.06 कोटी रुपयांनी घसरून 3,43,907.94 कोटींवर आली. भारतीय स्टेट बैंकची मार्केट कॅप 3,078.99 कोटींनी घसरून 3,00,268.56 कोटींवर आली. मात्र देशातील सर्वात मोठी खासगी बँक आईसीआईसीआई बँकेची मार्केट कॅप 2,412.18 कोटी रुपयांनी वाढून 3,94,315.01 कोटींवर पोहोचली.