आताच्या पिढीला जीवापेक्षा इतर गोष्टी फार महत्वाच्या वाटतात. यामध्ये सोशल मीडिया, PUBG या गोष्टी अग्रस्थानी आहेत. जीवापेक्षा या गोष्टींचा विचार पहिला केला जातो हे स्पष्ट झालं आहे. धावत्या रेल्वेसोबत सेल्फी घेणाऱ्या तरूणाचा देखील करूण अंत झाला आहे.
मथुरेत PUBG गेममुळे दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. दोन्ही विद्यार्थी बाहेर फिरायला गेले होते आणि मोबाईलवर गेम खेळू लागले. दोन्ही खेळता खेळता दोघं रेल्वे ट्रॅकवर बसले आणि तिथेच घात झाला.
दोघेही दहावीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील आहे. येथे दोन विद्यार्थी पबजी गेम खेळण्यात इतके मग्न झाले की ट्रेन आल्याच त्यांना लक्षातही नाही.
मोबाईलवर PUBG खेळण्यात व्यस्त असलेल्या दोन मुलांना मथुरेतील लक्ष्मी नगर परिसरात रेल्वेने चिरडले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय कपिल आणि 16 वर्षीय राहुल हे दहावीचे विद्यार्थी आहेत. दोघेही सकाळी फिरायला बाहेर पडले होते. जमुना पार पोलिस स्टेशनच्या एसएचओने सांगितले.
मथुरा कॅन्टोन्मेंट आणि राया स्थानकादरम्यान अपघातस्थळी हे दोन्ही मोबाईल सापडले आहेत. पोलीस अधिकारी म्हणाले की, मुलांचे नुकसान झाले तरीही दुसरीकडे खेळ सुरू होता.
सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर इतका वाढला आहे की त्या आभासी जगात लाइक्स मिळवण्यासाठी लोक जीवाचीही पर्वा करत नाहीत. युवा वर्गात तर लाईक्स मिळवण्यासाठी चढाओढ सुरु असते, आणि यासाठी त्यांची काहीही करायची तयारी असते.
अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. होशंगाबादमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. हा तरुण रेल्वे ट्रॅकजवळ उभा राहून व्हिडिओ बनवत होता. तरुणाच्या मृत्यूचा हा थरार कॅमेरात कैद झाला आहे.