नांदेडमध्ये कामगारांवर काळाचा घाला, अपघातात 5 जण जागीच ठार तर 5 गंभीर जखमी

नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही घटना काल (दि.24) रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे. नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारीफाटा करंजीजवळ ट्रक आणि आयशर या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.

या अपघाताची भीषणता एवढी होती यामध्ये पाच जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमींना तातडीने उपचारासाठी हिमायतनगर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील सोनारीफाटा करंजीजवळ रात्री साडेआठच्या सुमारास आयशर आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सगळे मजूर असल्याची माहिती मिळत आहे. ते बिहारमधून रेल्वेच्या कामासाठी आल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात बिहारमधून कामासाठी काही मजून जात होते यादरम्यान हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर परिसरात ते वास्तव्यास होते. दिवसभर काम आटोपून ते रात्री त्यांच्या ठिकाणी जात असताना त्यांच्यावर मोठे संकट आले. हे मजून आयशरमधून जात असताना सिमेंटने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा चक्काचूर झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या चौघांना हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.