कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 23 दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत. त्यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरूच आहेत. राजू श्रीवास्तव यांना पुन्हा ताप आला होता. हा ताप जवळजवळ 100 डिग्री इतका होता. डॉक्टरांनी सध्या राजू श्रीवास्तव यांचा व्हेंटिलेटर न काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पुन्हा ताप भरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजन लेव्हल सामान्य आहे.
राजू श्रीवास्तव सध्या शुद्धीवर आहेत. पण राजूच्या हात-पायांची हालचाल थोडी वाढली होती.राजू श्रीवास्तव यांना मंगळवारी थोड्या वेळासाठी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं होतं. ते 80-90% स्वतः नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत.