इंडियन आयडॉल 12′ या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलालची जादू चाहत्यांवर कायम आहे. शो दरम्यान, दोघांच्या लव्ह स्टोरीबाबतची बरीच चर्चा रंगली. लिंक-अपच्या बऱ्याच बातम्या आल्या. पण पवनदीप आणि अरुणिता एकमेकांना आपले चांगले मित्र मानतात.
दरम्यान, पवनदीप आणि अरुणिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते हृतिक रोशनच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ‘घुंगरू तुट गए’ या गाण्यावर दोघेही नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसच्या डान्स स्टुडिओतील आहे.
व्हिडिओमध्ये दोघेही ‘घुंगरू तुट गए’ या गाण्याचे हुक स्टेप करताना दिसत आहेत. सोबतच इंडियन आयडॉल 12′ सोबत फायनलिस्ट षण्मुखप्रिया देखील आहे.
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल या आठवड्यात डान्स रिअॕलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्येही दिसतील.
त्यांच्यासोबत सायली कांबळे आणि षण्मुखप्रियाही असतील. निर्मात्यांनी आगामी भागाचा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यात सर्वांनी गाणी गायली आहेत आणि स्पर्धक त्या गाण्यांवर परफॉर्म करत आहेत.
(फोटो गुगल)