मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणतात, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.” असं राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
तर, “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने पत्रकारपरिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे.