पुढील काही वर्षांसाठी मास्क घालून फिरावं लागेल

करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस जगभरामध्ये पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे. मात्र एकीकडे लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून केला जातोय. लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. असं असतानाच आता इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. मेरी रॅमसे यांनी एक मोठा दावा केलाय. पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असं डॉ. रॅमसे म्हणल्या आहेत.

डॉ. रॅमसे यांनी जगभरातील लोकांना आता काही प्रमाणात निर्बंधांची सवय लावणं गरजेचं आहे असंही म्हटलं आहे. पुढील काही वर्षांसाठी आपल्याला हे नियम पाळावे लागणार आहेत. या निर्बंधांच्या आधाराचे आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागणार आहे. सरकारलाही कोणतेही निर्बंध हटवण्याआधी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, असा इशाराही रॅमसे यांनी दिला आहे. जगभरातील सर्वच सरकारी यंत्रणांनी अगदी विचारपूर्वक पद्धतीने निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. कोणीही तातडीने निर्बंध उठवण्याची घाई करु नये. वयस्कर व्यक्तींना आणि इतर आजार असणाऱ्यांना करोनाचा अगदी वेगाने संसर्ग होऊ शकतो हा धोका लक्षात घेणं गरजेचं आहे, असंही डॉ. रॅमसे यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.