हरितालिका व्रताचं आज तुमच्या राशीत काय फळ? पाहा तुमचं राशिभविष्य

आज दिनांक 30 ऑगस्ट 2022. वार मंगळवार .आज भाद्रपद शुक्ल तृतीया. आज हरितालिका व्रत आहे. चंद्र आज दिवसभर कन्या राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

राशीच्या षष्ठ स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. गृहसौख्य मिळेल. मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज सुंदर खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस.

वृषभ

राशी स्थानात आलेला मंगळ कष्ट देणारा असून अनेक खर्च आणि अडचणी देईल. स्वभावात तेज येईल. व्यवसायात अनेक लाभ होतील. संतती सुख मिळेल. दिवस उत्तम.

मिथुन

गुरू दशम स्थानात असून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. चतुर्थ चंद्र आहे घरासाठी आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

कर्क

सप्तम स्थानात शनी जपून राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज तृतीय स्थानात असून घरात शुभ घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. दिवस उत्तम आहे.

सिंह

राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्रमंडळीपासून अनेक लाभ होतील. प्रकृती जपा. राशीतील रवी, बुध अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस मध्यम.

कन्या

पंचम शनी आणि राशीतील चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे. आर्थिक लाभ, कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल. व्यय रवी आहे. डोळ्यांची काळजी घ्या. दिवस शुभ.

तूळ

आज दिवस मध्यम असून भाग्य साथ देईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. खर्च होईल. उच्च शिक्षण आणि संततीसाठी शुभ दिवस आहे.

वृश्चिक

आज दिवस अतिशय आनंदी राहण्याचा आहे. गृहसौख्य, जोडीदार, संतती याबाबत शुभ फळ देईल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.

धनु

द्वितीय स्थानात वक्री शनी कुटुंबात मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील. माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल. शांततेत दिवस घालवा.

मकर

आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ वृषभ राशीत असून संतती चिंता राहिल आणि कौटुंबिक कलह होतील. वैवाहिक सुख कमी मिळेल. दिवस मध्यम.

कुंभ

व्यय स्थानामध्ये वक्री शनी आहे. अचानक स्वभावात तेज येईल. कार्य करण्याची इच्छा होईल. रवी, बुध कार्य घडवून आणेल. आर्थिक घडामोडी होतील. दिवस उत्तम आहे.

मीन

लाभ स्थानात शनी आणि सप्तम चंद्र अशी ग्रहस्थिती लाभ आणि वैवाहिक सुख दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची कामं येतील. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.