मुस्लिम झाकीर नाईकच्या
फाउंडेशनवर पाच वर्षांसाठी बंदी
केंद्र सरकारने कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (IRF) दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप करत मोठा निर्णय घेतलाय. गृह मंत्रालयाने मलेशियातून काम करणाऱ्या आणि सध्या जगभरात नेटवर्क असलेल्या या संघटनेवर ५ वर्षांची बंदी घातली आहे. या संघटनेचा प्रमुख झाकीर नाईकवर धार्मिक धृवीकरणासाठी चिथावणीखोर भाषणं करणं आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप आहे. बेकायदेशी कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (UAPA) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
उत्तर प्रदेशमधील एक्स्प्रेस वेचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं उद्घाटन झालं. ३४१ किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वे पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशला जोडत आहे. लखनऊमधील चांद सराय येथून सुरू होऊन तो गाझीपूरला पोहचतो. याच्या निर्मितीसाठी २२ हजार ४९७ कोटी रुपये खर्च आला आहे. हा एक्स्प्रेस वे लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपुर, आंबेडकरनगर, आझमगढ, मऊ आणि गाझीपूर या ९ जिल्ह्यातून जातो. जुलै २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर आज मोदींच्या हस्ते या एक्स्प्रेस वेचं उद्घाटन झालं. यावेळी भाषणात बोलताना मोदींनी उत्तरप्रदेशची भरभरून स्तुती केली.
सेकंदाला १ हजार कोटी डॉलर्स नफा,
लस तयार करणाऱ्या कंपन्यांचा
जगभरातल्या नागरिकांसाठी मस्त तयार करणाऱ्या कंपन्यांचा नफा किती असू शकतो याचा कुणीही अंदाज केलेला नव्हता! त्याची आकडेवारी एका संस्थेनं नुकतीच जाहीर केली आहे. पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. अहवालानुसर, फायझर, मॉडेर्ना आणि बायोएनटेक या तीन लस निर्मिती कंपन्या मिळून प्रत्येक मिनिटाला ६५ हजार कोटी डॉलर्सचा नफा कमावत आहेत. अर्थात, प्रत्येक सेकंदाला त्यांचा नफा १ हजार कोटी डॉलर्सहून जास्त आहे. ९ कोटी ३५ लाख डॉलर्स दिवसाला कमवत आहेत.
गुजरात मध्ये सार्वजनिक रस्त्यावरील
मांसाहारी पदार्थांचे स्टॉल हटवणार
गुजरातच्या अहमदाबादमधील सार्वजनिक रस्त्यांवरील मांसाहारी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बंदी घालण्याच्या हालचालीमुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना अडचणीत आणले आहे. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळांपासून दूर झालेल्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना आता आपली रोजीरोटी गमवावी लागण्याची भीती आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये मांसाहाराला विक्रीची परवानगी असताना आमच्यावरच कारवाई का, असा प्रश्न स्टॉल मालकांनी उपस्थित केले आहेत.
तैवानच्या मुद्द्यावरून
चीनने अमेरिकेला धमकावले
अमेरिकेने तैवानच्या मुद्द्यावरून चीनला इशारा दिल्यानंतर आता चीननं थेट अमेरिकेलाच धमकावलं आहे! चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावतीने बैठकीनतर एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये बैठकीत चीनकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेची माहिती देण्यात आली आहे. चीनमधील सरकारी माध्यम समूह असलेल्या शिहुआच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
भाई जगताप यांच्या विरोधात
सोनिया गांधींकडे तक्रार
मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत कलह आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बांद्रा पश्चिम भागातले काँग्रेस नेते झिशान सिद्दिकींनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार करणारं एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या एका रॅलीत या दोघांच्यात झालेल्या गोंधळासंदर्भाने हे पत्र लिहिलेलं आहे. झिशान यांनी पत्रात लिहिलं आहे की, मुंबईत १४ नोव्हेंबर रोजी एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाई जगताप यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली.
बिहारमध्ये रस्ते अपघातात सहा
जणांचा मृत्यू, सुशांत सिंहचे नातेवाईक
एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराहून परतत असताना झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बिहारमधील लखीसराय या ठिकाणी झाला. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५ जण हे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील सिंकदरा-शेखपुराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील हलसी पोलीस ठाणे क्षेत्रातील पिपरा गावाजवळ हा अपघात घडला.
उपग्रह भेदी क्षेपणास्त्राची
रशियाकडून यशस्वी चाचणी
सोव्हिएत रशिया आता पुन्हा एकदा नवी उभारी घेण्याची प्रयत्न करत आहे. विविध माध्यमातून आपले अस्तित्व जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, संरक्षण क्षेत्रात आपली ताकद वाढवत आहे. रशियाने उपग्रहाचा वेध घेणारी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत जगात चर्चेत रहाण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे ३५० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेला Kosmos-1408 या कृत्रिम उपग्रहाचा जमिनीवरुन क्षेपणास्त्र डागत रशियाने यशस्वीरित्या वेध घेतला. सुमारे एक टन वजनाचा Kosmos-1408 हा हेरगिरी उपग्रह १९८२ ला प्रक्षेपित करण्यात आला होता.
5000 बाळंतपणासाठी मदत
करणाऱ्या परिचारिकेचा प्रसुतीनंतर मृत्यू
तब्बल ५ हजार महिलांना बाळंतपणासाठी मदत करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूतीनंतर उद्भवलेल्या काही समस्यांमुळे मृत्यू झाला. ज्योती गवळी (३८) असं या परिचारिकेचं नाव आहे . ज्योती गवळी यांनी २ नोव्हेंबर रोजी हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. रविवारी नांदेड येथील रुग्णालयात न्यूमोनिया आणि इतर आजारांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
SD social media
9850 60 3590