नवीन नोकऱ्यांमध्ये मासिक एक टक्के स्थिर वाढ

सप्टेंबरमध्ये नवीन नोकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीत वाढ झाल्यामुळे मुख्यत्वे प्रिंटिंग आणि पॅकेजिंग क्षेत्रात तसेच बीपीओ आणि आयटीईएस, आयात आणि निर्यात क्षेत्रांमध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली. मॉन्स्टर डॉट कॉमच्या मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सनुसार, या वर्षी ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये नवीन नोकऱ्यांमध्ये एक टक्क्यांची स्थिर मासिक वाढ झाली. अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर 2021 मध्ये ऑनलाईन विक्री वाढल्यामुळे प्रिंटिंग आणि पॅकेजिंगसाठी भरती 11 टक्क्यांनी वाढली. त्यानंतर बीपीओ आणि आयटीईएस पाच टक्के, आयात आणि निर्यात चार टक्के, किरकोळ दोन टक्के आणि प्रवास आणि पर्यटन दोन टक्क्यांनी वाढले.

सप्टेंबर 2020 च्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये नवीन नोकऱ्यांमध्ये नऊ टक्के सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले, जे उर्वरित वर्षांसाठी आशादायी आहे. कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव असूनही गेल्या सहा महिन्यांत नवीन नोकऱ्यांमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निर्देशांकाने दर्शविले.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने बुधवारी सांगितले की, यंदा सुमारे 45,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, कारण अॅट्रिशन रेट (कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दर) मध्ये मोठी वाढ झालीय. इन्फोसिसचे सीओओ (यूबी) प्रवीण राव म्हणाले, “बाजारातील सर्व संभाव्यतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या महाविद्यालयीन पदवीधरांच्या नियुक्तीचा कार्यक्रम या वर्षी 45,000 पर्यंत वाढवू. याव्यतिरिक्त आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या आरोग्य आणि निरोगीपणाच्या उपाययोजना, पुनर्रचना कार्यक्रम आणि करिअर वाढीच्या संधी यासह गरजा पूर्ण करणे सुरू ठेवू.

देशातील सर्वात मोठी आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 35,000 नवीन पदवीधरांची नियुक्ती करण्याची त्यांची योजना आहे. कंपनीने गेल्या सहा महिन्यांत 43,000 पदवीधरांना आधीच नियुक्त केले. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा अॅट्रिशन रेट वाढून 11.9% झाला जो मागील तिमाहीत 8.6% होता.

आयटी दिग्गज विप्रोचे सीईओ आणि एमडी, थियरी डेलापोर्टे यांनी आपल्या दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या अद्ययावतनादरम्यान सांगितले की, कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 8,100 तरुण सहकाऱ्यांसह नवीन फ्रेशर्सची भरती दुप्पट केलीय.

एचसीएल टेक्नॉलॉजीजने गुरुवारी सांगितले की, कंपनी या वर्षी सुमारे 20,000-22,000 फ्रेशर्स पदवीधर घेण्याचा विचार करीत आहे आणि पुढील वर्षी 30,000 फ्रेशर्स घेण्याची योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.