पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ
पंढरीच्या विठुरायाच्या चरणी दान देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. इथे दर्शनाला येणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या तिजोरीत ४ कोटी ७७ लाख इतके दान विविध माध्यमांतून जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समितीला मिळणाऱ्या दानात १ कोटी ५६ लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
“२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा
२४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं दिला आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अन्यथा सरकारला जड जाईल. आमच्यावर अन्याय करत राहिला, तर मर्यादा आणि संयम कितीदिवस बाळगायचा, याचाही विचार करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. ते जालन्यातील सभेत बोलत होते.
बारामतीचा गड शरद पवार की अजित पवार कायम राखणार ?
राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत कोणती भूमिका घेतात यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असताना बारामतीसह राष्ट्रवादीच्या ताब्यातील चारही मतदारसंघातील निवडणूक लढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. बारामतीचा गड शरद पवार की अजित पवार यापैकी कोण कायम राखते याचीच साऱ्यांना आता उत्सुकता असेल.
हवाई दलाच्या महासंचालकपदाची धुरा मराठी माणसाच्या हाती; एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार
हवाई दल मुख्यालयात निरीक्षण तसेच सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल संजीव कपूर हे हवाई दलात ३८ वर्षांचा प्रतिष्ठित सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून ३० नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी आजपासून हा पदभार स्वीकारला.
‘गो फर्स्ट’चे सीईओ कौशिक खोना यांचा राजीनामा, कर्मचाऱ्यांसाठी भावनिक संदेश लिहित झाले पायउतार
‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी राजीनामा दिला आहे. गो फर्स्ट कंपनीच्या विमानांची सर्व उड्डाणे निलंबित केल्यानंतर आणि कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी कौशिक खोना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गुरुवारी एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये खोना म्हणाले की, ३० नोव्हेंबर हा माझा कंपनीतील शेवटचा दिवस आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा शिल्पकार कालवश; जगभरातून श्रद्धांजली
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर रिपब्लिकन पक्षाच्या रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर आपली छाप सोडली, ती त्यांच्या निवृत्तीनंतरही अनेक वर्षे टिकून राहिली. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण किसिंजर यांच्या हातात असताना आणि नंतरही ते एकाच वेळी प्रशंसा आणि बदनामीचे धनी झाले होते.
PCBचा अजब कारभार, मॅच फिक्सिंगमध्ये शिक्षा भोगून आलेल्या खेळाडूला दिले निवड समितीमध्ये मोठे पद
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी राष्ट्रीय निवड समितीमध्ये माजी कर्णधार सलमान बट्टचा समावेश केला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने सलमानवर पाच वर्षांची बंदी घातली होती. यानंतर २०१६ मध्ये या खेळाडूने क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. ३९ वर्षीय सलमानसह माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमल आणि राव इफ्तिखार अंजुम यांना मुख्य निवड समितीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज वहाब रियाझला मुख्य निवडकर्ता बनवले आहे.
टाटा टेक्नॉलॉजीच्या लिस्टिंगमुळे उत्साहाचे वारे
कालच बाजारांनी आपला खरेदीचा उत्साह कायम ठेवत पुन्हा एकदा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सत्रात निफ्टीने पुन्हा एकदा वीस हजारांची पातळी गाठली. तर आज बाजार बंद होताना निफ्टी-फिफ्टी २०१३३ वर स्थिरावला. अपेक्षेप्रमाणे मिडकॅप आणि स्मॉल कॅपमधील घोडदौड कायम टिकली आहे.बहुप्रतिक्षित ‘टाटा टेक’ या कंपनीचा लिस्टिंगचा दिवस ऐतिहासिक ठरला. बाजारात उतरल्यावर पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर १६८ टक्क्यांनी वाढला. पब्लिक इश्यूमध्ये ५०० रुपयाला दिलेला शेअर बाजार सुरू होताच १४० % वाढून १३३४ पर्यंत जाऊन पोहोचला. आयपीओनंतर लिस्टिंगच्याच दिवशी गुंतवणूकदारांना घसघशीत नफा मिळवून देणाऱ्या आघाडीच्या सहा कंपन्यांमध्ये ‘टाटा टेक’ चा समावेश झाला आहे. गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या आयपीओला ६९ पट अधिक बोली लागली होती हे लक्षात घ्यावे.
“माझी पत्नी ८५० रुपयांत घर चालवायची…” मुलाखतीदरम्यान प्रशांत दामलेंचा खुलासा
गेली चार दशकं नाटक, चित्रपट अन् टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं प्रशांत दामले हे नाव आपल्या सगळ्यांनाच परिचयाचं आहे. सध्या ते अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही कारभार बघत आहेत. प्रशांत दामले यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. फेब्रुवारी १९८३ पासून आजवर त्यांनी १२५०० पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग केले आहेत.प्रशांत दामले हे अभिनेते उत्तम गायक तर आहेतच याबरोबरच ते एक उत्तम निर्मातेही आहेत. आपल्या याच नाट्यमय प्रवासाबद्दल नुकतंच प्रशांत दामले यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्ट शोमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या.
“मला आठवतंय साधारणपणे गौरी ८५० रुपयांत घर चालवायची आणि कुठेही काही कमी नसायचं, तक्रार नसायची. मला पहिली नाइट २५ रुपये मिळाली होती, त्यानंतर ७५ रुपये झाली. विश्वास आणि व्यवस्थापन यामुळेच हे सगळं शक्य झालं. १९९२ ला जेव्हा ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाला पहिला हाऊसफूलचा बोर्ड लागला तेव्हा मी गौरीशी बोललो की आता बेस्टमध्ये आपली जागा फार काळ अडवून ठेवण्यात काही अर्थ नाही. माझ्याजागी तिथे दुसऱ्याला नोकरी लागू शकते, आता या नाटकावर आपण पुढे जाऊ शकतो, तेव्हा तिनेही मला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी नोकरी सोडून फक्त नाटकावर लक्षकेंद्रित केलं.”
SD Social Media
9850603590