स्टँड-अप कॉमेडियन वीर दास पुन्हा एकदा वादात, भारतीयांकडून त्याच्यावर टीका

लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास पुन्हा एकदा वादात सापडला आहे. वीर दासने दोन दिवसांपूर्वी त्याचा अमेरिकेतल्या शोमध्ये भारतीयांबद्दल केलेत्या वक्तव्यानंतर, जगभरातील भारतीयांकडून त्याच्यावर टीका केली जात आहे.

जॉन एफ. केनेडी सेंटरच्या त्याच्या शोच्या शेवटी, त्यानी ‘Two India’ (दोन भारत) या शीर्षकाखाली एकपात्री प्रयोग सादर केला. त्यात त्याने म्हटले, “I come from an India where we worship woman during day and gang rape them at night ” (मी अशा भारतातून येतो जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो).

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोकांनी त्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे, परंतु अनेकांनी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

भारताविरुद्ध अपशब्द वापरल्या प्रकरणी, वीर दासच्या विरोधात मुंबई पोलिसकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅडव्होकेट आशुतोष दुबे, भाजप-महाराष्ट्राचे कायदा सल्लागार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, वीर दासने या वादावर ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यानी लिहिले, “मी यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आली आहे. हा व्हिडिओ वेगळ्या गोष्टी करणाऱ्या दोन अत्यंत वेगळ्या भारताच्या द्वैताबद्दल व्यंग आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.