जगाला आर्ट ऑफ लिव्हिंगची शिकवण देणाऱ्या श्री श्री रविशंकर यांचा आज (१३ मे) प्रकट दिवस. जाणून घ्या त्यांच्या विषयी..
सध्याचा काळ अतिशय भयावह आहे. विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशातच तिसरी लाट येणार लहान मुलांना ही संसर्ग होणार ही शक्यता वर्तवली जात आहे. आणि सामान्य माणसाला प्रश्न पडला आहे की स्वतः चे आणि स्वतः च्या कुटुंबाचे रक्षण करावे तरी कसे ….
आणि लोकांनी आर्ततेने केलेल्या प्रार्थनेला सतत हाक देणारे अध्यात्मिक गुरू, प. पू. श्री श्री रविशंकर आणि त्यांची संस्था आर्ट ऑफ लिव्हिंग आज ही संपूर्ण विश्वाचा आधार बनली आहे …. सेवेसाठी सज्ज आहे…
कोणत्याही व्याधीचा प्रतिकार करण्यासाठी ओज (सत्व) उंच ठेवणे गरजेचे असते. आत्मबल , मनोबल जर उंच असेल तर रुग्ण अर्धी लढाई तिथेच जिंकतो …
म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकर जी ह्यांनी सुरुवातीच्या पहिल्या लाट मध्येच तब्बल २१ दिवस ऑनलाईन ध्यान घेतले …ज्यामुळे भरपूर रुग्णांना आजारी होऊन देखील त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले नाही ….
भगवत गीतेमध्ये श्री कृष्णाने सांगितले आहे ” केवळ अध्यात्म च भयापासून मुक्त करू शकते” … तसेच नारद भक्ती सूत्रात सांगितले आहे
“उद्यमो भैरव”
ह्या सुत्राला जीवनात ऊतरवत ह्या संस्थे च्या प्रशिक्षकांनी ताबडतोब “ऑनलाईन ब्रेथ एंड मेडीटेशन” शिविर घेण्यास सुरूवात केली …ज्या शिबिराचा प्रमुख भाग आहे “सुदर्शन क्रिया” …
सुदर्शन क्रिया ही केवळ अध्यात्मिक प्रक्रिया नसून ह्यामागे विज्ञान आहे कसे ते आज जाणून घेऊया …
आपल्या शरीरातील ८९-९२% विषारी द्रव्य हे श्वासांद्वारे बाहेर फेकल्या जात असतात …पण आपण आपल्या फुफ्फुसांचा योग्य वापर केला तरच …
सुदर्शन क्रिया आणि ह्याचे प्राणायाम आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता खूप झपाट्याने वाढवण्याचे काम करतात … ज्यामुळे मनुष्याच्या “प्राण ऊर्जेचा” स्तर सतत उंच राहतो …
सध्या भरपूर लोक योग प्राणायाम ह्या आपल्या पुरातन शास्त्राकडे वळताना दिसत आहेत …त्याचा फायदा ही त्यांना निश्चितच मिळत आहे …. आणि ह्याला जर सुदर्शन क्रिये ची जोड मिळाली तर संसर्ग होण्यापासून किंवा संसर्ग झालाच तर त्यापासून काहीही त्रास न होता आपली सुटका होऊ शकते ….
कारण सुदर्शन क्रिया ही शारीरिक , मानसिक , भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर काम करत असते …..
अनेक लोक मागील वर्षापासून अस्वस्थता , चीड चीड , भीती ह्या मानसिक आजाराने देखील ग्रासले आहे …
“योग चित्त वृत्ती निरोधः “
ह्या पतंजली योग सुत्रातील सूत्रानुसार ह्या सर्व आजारातून योग , सुदर्शन क्रिया आणि ध्यान मनुष्याला मुक्त करू शकते… पण आम्हाला श्वासाकडे लक्ष द्यायला वेळ च नसतो खरतर कोव्हीड नावाच्या ह्या भयंकर आजाराने आम्हाला आमच्या श्वासाची किंमत करायला शिकवले आहे … कारण आपण आपल्या मनाला आपल्या श्वासाद्वारे नियंत्रित करू शकतो … योगा द्वारे शरीर सुदृढ ठेवू शकतो …आणि सुदृढ शरीरात रोगाचे वास्तव्य राहण्याचा प्रश्न उद्भवतच नाही …त्याची शक्यता अगदी नाहीशी होऊन जाते ….
म्हणून आग्रह पूर्वक विनंती आहे …हा लेख वाचणाऱ्या लोकांनी जरूर ह्या शिबिराचा लाभ घ्यावा .
आज” तेरा (१३) मे” ही नुसती तारीख नसून कितीतरी लोकांसाठी हा आधार आहे , काहींसाठी विश्वास , काहींसाठी श्रध्दा , काहींसाठी निष्ठा , काहींसाठी भक्ती तर काहींसाठी अगदी ईश्वरा चे रुप ….कारण आज च्याच दिवशी गुरूदेवांचा जन्म झाला …आपल्या सारख्या लाखो करोडो लोकांचा आधार बनण्यासाठी ….
त्यांचा जन्म म्हणावा की ईश्वरी अवतार ह्या प्रश्नाचे उत्तर तर तोच देऊ शकतो ज्याने भक्तीचे अमृत चाखले आहे ….
नारद भक्ती सूत्रात सांगितले आहे.
“भक्ती- अमृत स्वरूपा च् “
ह्या भक्तीच्या अमृताचा वर्षाव तुमच्या सगळ्यांचा जीवनात होवो ही च गुरुचरणी प्रार्थना करते …
डॉ.राधा जोशी हस्तक
७७४४९५९५१०
(शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क करू शकता)