शरद पवारांचे नातू ईडीच्या रडारवर, ‘ग्रीन एकर’च्या चौकशीचे आदेश, रोहित पवारांच्या अडचणी वाढणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. रोहित पवार हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून वारंवार राज्य सरकार, भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. ते सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं रोखठोक मत मांडताना दिसत आहेत. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांच्या पाठीमागे आता ईडीचा ससेमिराला लागण्याची शक्यता आहे. कारण रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा’, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा मोठा खुलासा
श्रीनगरच्या लाल चौकासह राज्यात आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून याबाबत पुण्यातील आठही गणेशोत्सव मंडळांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यासाठी पुण्यातून गणपतीची मूर्ती श्रीनगरला पाठवण्यात येणार असल्याचंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते.
आज झालेल्या पत्रकार परिषदेतील घोषणेशी श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सहमत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा करण्यात आली आहे. पोलिसांकडून याबाबतील आम्हाला विचारणा करण्यात आल्यानंतर हा खुलासा करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
खोदा जेवढं खोदायचंय, मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जाताहेत : एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याविरोधात चौकशी सुरु झाली आहे. जळगाव दूध संघात खडसेंचं वर्चस्व होतं. पण दूध संघात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांप्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. तसेच तिथे असलेलं संचालक मंडळ रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे जळगाव दूध संघातील खडसेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील पुन्हा संघर्ष वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी मोठं विधान केलं आहे. आपल्याला जेलमध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही जणांनी तर जेलमध्ये जाण्याच्या तारख्या देखील दिल्या आहेत, असं खळबळजनक विधान खडसेंनी केलं आहे.
१५०० कुटुंबाचं वीज आणि गॅस कनेक्शन बंद! ट्विन टॉवर्स भागातील वाचा अपडेट्स
नोएडाच्या सेक्टर-93A मध्ये असलेले सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या ९ सेकंदात हा टॉवर उद्ध्वस्त करण्यात येईल अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या आजूबाजूच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपलं घरं तात्पुरतं सोडण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
याचा फटका नोएडातील नागरिकांना बसणार आहे. सुपरटेक ट्विन टॉवरहून पुढे जाणाऱ्या वीज आणि गॅस पाईपचं कनेक्शन देखील उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ शकतात. नागरिकांनी आपली कामं आजच पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे.
जागतिक ऊर्जा संकटामुळे भारतासह अन्य देश अणुऊर्जेला चालना देण्यासाठी सरसावले
जागतिक ऊर्जा संकटानंतर जपान, चीन , भारत आणि दक्षिण कोरियाची सरकारं अणुऊर्जेला चालना देण्याच्या दिशेने आणखी पावलं उचलत आहेत.
जपान आणि दक्षिण कोरियामधली सरकारं अण्वस्त्रविरोधी धोरण हटवत आहेत. दुसरीकडे, भारत आणि चीन हे देश भविष्यात ऊर्जेचा पुरवठा करताना येणारी टंचाई टाळण्यासाठी आणि उत्सर्जन रोखण्यासाठी अधिक अणुभट्ट्या बांधण्याचा विचार करत आहेत. दक्षिण पूर्व आशियातले विकसनशील देशसुद्धा आण्विक तंत्रज्ञानाचा शोध घेताहेत.
उदय उमेश लळीत सरन्यायाधीश पदी ; सोलापूरकरांसाठी आनंदाचा दिवस
उदय उमेश लळीत यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाचा शपथविधी सोहळा दूरदर्शनवर पाहताना सोलापूरकर अक्षरशः सुखावले. न्या. लळीत यांच्या रूपाने सरन्यायाधीशपदाचा हा बहुमान सोलापूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.
SD Social Media
9850 60 3590