ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलेय. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत.
गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला होता तेव्हा राज्यात सॅनिटायझरची कमतरता होती. तेव्हा राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करुन कोरोना विषाणू संसर्गाच्या लढ्यात योगदान दिलं होतं.
विशाखापट्टणम येथून महाराष्ट्राकडे निघालेली ऑक्सिजन ट्रेन आज रात्री नागपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर उद्या सकाळी नाशिकला पोहोचेल. नाशिकमधून राज्यातील विविध भागात ऑक्सिजन पोहोचवला जाणार आहे