श्रवण यांचा अल्पपरिचय.
१९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये नदीम- श्रवण या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. नदीम सैफी हे आपले मित्र श्रवण राठोड यांच्या सोबतीने संगीतकार नदीम- श्रवण या नावाने गाण्यांना चाली लावायचे. या जोडीने पहिल्यांदाच १९७९ मध्ये भोजपुरी चित्रपट ‘दंगल’मध्ये संगीत दिले होते. पण नदीम-श्रावण यांना खरी ओळख ‘आशिकी’ चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते. त्यांची जोडी गुलशन कुमारची टी मालिकेची आवडती जोडी होती. दरम्यान, टी- सीरिज कंपनीचे सर्वेसर्वा गुलशन कुमार यांची हत्या झाली. या हत्येमध्ये नदीम यांचे नाव आले होते. या घटनेनंतर ही जोडी तुटली. २००० पासून नदीम हे अज्ञातवासात आहेत. गायक विनोद राठोड हे श्रवण राठोड यांचे बंधू होत. नदीम – श्रवण जोडीने आशिकी, साजन, सडक, दिल है के मानता नही, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, धडकन, परदेस यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले आहे.