मुंबईतलं राजकारण बाळासाहेब ठाकरेंच्या नावाभोवती? फडणवीस-उद्धव यांच्यात जुंपली
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. त्यांच्या याच उल्लेखावर आक्षेप घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धीपत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्व संपत असल्याची नांदी आहे हे कबुल केलं, असं विधान केलं. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाभोवती फिरताना दिसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची भीती, सोनिया गांधी बॅकफूटवर, हायकमांडने मोठा निर्णय बदलला
महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. शिवसेनेत पडलेली फूट हे त्याचं ताजं उदाहरण आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर आता काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचं नाव त्यामध्ये आघाडीवर होतं. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण त्यावर चव्हाणांनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. पण तरीही काँग्रेसचा मोठा गट फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने मोठा निर्णय घेतला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेसचे 11 आमदार सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांड या 11 आमदारांवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. या आमदारांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचंदेखील नाव होतं. या कारवाईमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तर मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. कदाचित महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आमदार त्यांच्यासोबत भाजपमध्ये जावू शकतात. या भीतीने काँग्रेस हायकमांडने त्या 11 आमदारांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे 11 आमदारांवर कारवाई करण्याची शिफारस निरीक्षक मोहन प्रकाश यांनी केली होती. पण आता कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मेळघाटात आदिवासी महिला आक्रमक, अजित पवारांचा अडवला ताफा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज एक अनपेक्षित घटना घडली. मेळघाटातील कळमखार गावात संतप्त आदिवासी महिलांनी अजित पवारांचा ताफा रोखला. पावसाळ्याच्या दिवसात नालीचे पाणी घरात जात असल्याने त्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी अजित पवारांनी महिलांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला.
आदिवासी महिलांनी पावसाच्या दिवसात सांडपाणी घरात येत असल्याची तक्रार करत रोष व्यक्त केला. तसेच आदिवासी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही, असं गऱ्हाणं त्यांनी अजित पवारांपुढे मांडलं. या प्रकरणी त्यांनी रोषात अजित पवारांना जाव विचारला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
छोटा राजन टोळीच्या शार्प शूटरच्या नांग्या ठेचल्या, ठाणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
ठाणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याकांड प्रकरणातील आरोपी, गुन्हेगारी टोळीचा प्रमुख छोटा राजनच्या टोळीचा फरार शूटरला बेड्या ठोकण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे. खरंतर हा फरार आरोपी आधी जेलमध्येच कैद होता. पण पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरच्या बॉडीगार्डच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी छोटा राजनच्या टोळीचा शूटर बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद याला बेड्या ठोकल्या होत्या. तो पळून गेला होता. पण त्याला पुन्हा शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा ‘नकार’, आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण?
2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहे. मात्र, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस मोदींचा पराभव कसा करणार? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. काँग्रेसचा पुढचा प्रमुख कोण असेल याबाबत सध्या कोणतेही स्पष्ट संकेत नसल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे. खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, आता काँग्रेसचे बहुतांश 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, असे सोनिया गांधींसह नेत्यांचे मत आहे. मात्र, यावर राहुल गांधी यांच्या ‘हो’ची प्रतीक्षा आहे.
एनडीटीव्हीने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षपदाची भूमिका राहुल गांधी यांनी स्वाकारावी यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आले नाही. 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पराभव दिला होता.
SD Social Media
9850 60 3590