रुद्राक्ष महादेवाचा प्रसाद मानले जाते. ती एक चमत्कारिक वस्तू आहे. रुद्राक्षांचे अनेक प्रकार आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या देवता आणि इच्छा यांच्याशी संबंधित आहेत. आजकाल बरेचजण रुद्राक्ष धारण करतात. कोणी गळ्यात तर कोणी हाताच्या मनगटावर रुद्राक्ष बांधतो. मात्र तुम्हाला माहित आहे का? रुद्राक्ष धारण करण्याचे किंवा घालण्याचे काही नियम आहेत. त्यानुसारच रुद्राक्ष धारण करणे चांगले असते.
– मांस आणि मद्य सेवन करताना चुकूनही रुद्राक्ष धारण करू नये. असे केल्याने राशीला अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात.
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने रुद्राक्ष धारण केला असेल तर त्याने झोपताना रुद्राक्ष उतरवावा. झोपताना रुद्राक्ष धारण केल्याने तो अपवित्र होतो. झोपताना रुद्राक्ष काढून डोक्याजवळ ठेवावा आणि सकाळी आंघोळ करून धारण करावा.
– घरात बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा घरातील मृत्यूच्या वेळी रुद्राक्ष धारण करू नये. हा सुतक काळ मानला जातो आणि सुतकमध्ये रुद्राक्ष धारण करणे अशुभ आहे.
– काळ्या धाग्यात रुद्राक्ष कधीही धारण करू नका. फक्त लाल, पिवळा किंवा पांढरा धागा वापरा.
– रुद्राक्ष चांदी, सोने किंवा तांब्यामध्येही धारण करता येतो.
– रुद्राक्ष धारण करताना ‘ओम नमः शिवाय’ चा जप करावा. पूर्ण शुद्धतेने रुद्राक्ष धारण करा.
– तुमचा रुद्राक्ष चुकूनही दुसर्याला घालण्यासाठी देऊ नका.
– रुद्राक्ष नेहमी विषम संख्येने धारण करावा.
– 27 पेक्षा कमी रुद्राक्षाची माळ कधीही धारण करू नका. असे केल्याने शिव दोष जाणवतो.