उत्तर महाराष्ट्राला कोरोनाने तूर्तास दिलासा दिला असून, विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चक्क 97.63 टक्क्यांवर गेले आहे.
विभागात आजपर्यंत 9 लाख 88 हजार 397 रुग्णांपैकी 9 लाख 65 हजार 05 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 3 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी मंगळवारी दिली. नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 70 लाख 68 हजार 510 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 88 हजार 397 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 09 हजार 322 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 99 हजार 896 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 778 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.
नगर जिल्ह्यात प्रमाण 97.23 टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 50 हजार 227 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 3 लाख 40 हजार 531 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 2 हजार 762 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के इतके आहे. आजपर्यंत 6 हजार 934 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.97 टक्के आहे.
धुळे जिल्ह्यात प्रमाण 98.41 टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 880 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 45 हजार 154 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 06 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.45 टक्के आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रमाण 98.18 टक्के
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 759 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 1 लाख 40 हजार 169 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 12 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के इतके आहे. आजपर्यंत 2 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.80 टक्के आहे.
नंदुरबार जिल्ह्यात प्रमाण 97.62 टक्के
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 209 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 255 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 02 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के इतके आहे. आजपर्यंत 951 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 2.36 टक्के आहे.