दिल्लीच्या नवं मद्य धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया मुख्य आरोपी

सीबीआयकडून FIR दाखलं

दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. जवळपास दहा तासांपासून सीबीआय सिसोदियांच्या घरी तपास करत आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याविरोधात सीबीआयनं मनीष सिसोदियांसोबत १५ आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सिसोदियांना घोटाळ्यातील मुख्य आरोपी सांगण्यात आलं आहे.

सिसोदिया यांनी गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत १५ जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती.

छापेमारीनंतर सिसोदियांचे ट्वीट

“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.तसेच, “सत्य लवकर समोर यावे म्हणून आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. चांगले शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कोणीही रोखू शकत नाही,” असे देखील सिसोदिया म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.