‘लाँग कोव्हिड’ म्हणजे काय, जाणून घ्या याविषयी

बर्‍याच अभ्यासानुसार, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी जवळजवळ 50 टक्के असे लोक आहेत, जे यातून रिकव्हर झाल्यानंतरही त्यांना पूर्णपणे बरे वाटत नाही. अशा रूग्णांमध्ये, कोरोनाशी संबंधित काही समस्या सुमारे 6 महिन्यांपर्यंत दिसतात. याला ‘लाँग कोव्हिड’ किंवा ‘पोस्ट कोविड सिंड्रोम’ असे नाव देण्यात आले आहे.

‘लाँग कोव्हिड’ म्हणजे काय? (what is long covid)

बर्‍याच संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सामान्यत: संसर्ग झाल्यापासून 1 ते 2 आठवड्यांच्या आत बरे होतात. तर, गंभीर लक्षणे (Sever Symptoms) असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी 6-7 आठवडे लागतात असे दिसून आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतरही म्हणजेच रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही, जर त्यांना हलका खोकला, डोकेदुखी, शरीरात वेदना, थकवा, श्वास घेण्यात त्रास किंवा चव न लागणे, सुगंध न येणे या समस्या दिसत असतील, तर त्याला ‘लाँग कोव्हिड’ म्हणतात.

ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये 20 हजार लोकांनी भाग घेतला होता. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कोरोना संसर्ग झालेल्या 5 पैकी 1 व्यक्तीमध्ये बरे झाल्यानंतरही 5 ते 12 आठवड्यांपर्यंत या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. लाँग कोव्हिडची ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दुप्पट दिसून आली आहे

‘या’ लक्षणांकडे लक्ष ठेवा

कोरोनामुळे रुग्णाला खोकला येत असेल, तर त्यामुळे श्वसनमार्गामध्ये जळजळ होऊ शकतो. ज्यामुळे संसर्ग बरा झाल्यावरही कफाची समस्या कित्येक आठवडे किंवा महिने टिकू शकते.

अभ्यासानुसार, कोरोनामुळे पाचन प्रणालीवर वाईट परिणाम झाल्याने अतिसाराची समस्या बराच काळ टिकून राहू शकते.

आजारातून बरे झाल्यानंतर, बर्‍याच रुग्णांमध्ये चव घेण्याची क्षमता नसते, ज्यामुळे त्यांना भुक देखील लागत नाही आणि काही खावे असे देखील वाटत नाही. ही समस्या कित्येक आठवडे टिकून राहते.

लाँग कोव्हिड ग्रस्त असलेले जवळजवळ 80 टक्के रुग्ण थकल्यासारखे दिसतात आणि त्यांना अशक्तपणा जाणवतो.

कोरोना हा एक श्वसन रोग आहे, हे स्पष्ट आहे की संसर्ग बरा झाल्यानंतरही रुग्णांना दीर्घ काळापर्यंत श्वासोच्छवासाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.