राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. मुंबई ठाण्यासह काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
आपात्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रक काढले आहे. ठाण्यामध्ये मागील आठवभऱ्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यला अलर्ट दिल्यामुळे दोन दिवश शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, मुंबईतील स्थानिक परिस्थिती पाहून उद्या सुट्टी देण्याबाबत सक्षम प्राधिकरण यांनी निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहे.