भारतात ५४ हजार नव्या रुग्णांची उच्चांकी नोंद

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. काल राज्यासह देशांमध्ये करुणा संसर्ग झालेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद करण्यात आली आहे. साधारणपणे ५४ हजार नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत ही संख्या एका दिवसासाठी सर्वाधिक आहे. यासोबतच भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात गुरुवारी २३ ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २१ तासात भारतात ५३ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले असूण २५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

भारतात सध्याच्या घडीला रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ रुग्णांवर पोहोचली असून १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार १९२ इतकी असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ६९२ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.