बिग बुल अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. झुनझुनवाला आपल्या मागे अब्जावधी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले. यामध्ये त्यांचं ड्रीम होम देखील आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी मुंबईमध्ये बीजी खेर मार्गावर १४ मजली इमारतीची जागा विकत घेतली होती. तिथे त्यांना आपलं ड्रीम होम उभं करायचं स्वप्न पाहिलं होतं. झुनझुनवाला यांना संपूर्ण इमारत विकत घ्यायची होती. 2013 मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेनं 6 अपार्टमेंट विकायचा निर्णय़ घेतला. मात्र फक्त अपार्टमेंटपेक्षा इमारतीच्या जागेला जास्त किंमत मिळू शकते ही गोष्ट बँकेच्या लक्षात आली.
ही जागा एकाच व्यक्तीनं विकत घ्यावी असं बँकेला वाटत होतं. त्यावेळी अनेक दिग्गज गुंतवणूकदार या जागेकडे डोळे लावून होते. मात्र राकेश झुनझुनवाला यांनी 371 कोटी रुपये देऊन ही जागा विकत घेतली. ही इमारत पाडून स्वतःसाठी बंगला बांधण्याची त्यांची योजना होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली. त्यांनी आता आपल्यासाठी 14 मजल्यांची एक सी फेसिंग इमारत बांधण्याचा निर्णय घेतला.
तब्बल 70 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या झुनझुनवाला टॉवरला पालिकेकडून मान्यता मिळाली आहे. या इमारतीतील प्रत्येक मजल्याचं वेगळं वैशिष्ट्य असेल. चौथ्या मजल्यावर एक बँक्वेट हॉल आहे. ज्यामध्ये झुनझुनवाला कुटुंब एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करू शकतं. आठव्या मजल्यावर जिम आणि मसाजसारख्या सुविधा आहेत.
12 वा मजला सर्वात जास्त प्रशस्त असून जिथे झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी राहणार होत्या. या मजल्यावरील प्रत्येक खोली प्रशस्त ठेवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या बाथरूमचा आकार मुंबईत विकल्या जाणार्या सरासरी 1 बीएचके फ्लॅटपेक्षाही जास्त मोठा आहे. तर, त्यांची 731 स्क्वेअर फूटची मास्टर बेडरूम सध्या बिल्डर्स विकत असलेल्या 2 बीएचके फ्लॅटपेक्षा 20 टक्क्यांनी मोठी आहे.
झुनझुनवालांची लिव्हिंग आणि डायनिंग रूम एखाद्या लक्झरी प्रोजेक्टमधील 3 बीएचके अपार्टमेंटच्या आकारापेक्षाही मोठी आहे. सर्वात वर टेरेस असेल, ज्यामध्ये व्हेजिटेबल गार्डन , कंझर्व्हेटरी एरिया आणि आउटर सीटिंग डेकचा समावेश आहे.
सध्या त्यांच्या ड्रीम होमचं काम सुरू आहे. ते ड्रीम होम पाहण्यासाठी मात्र झुनझुनवाला आज नाहीत याचं हळहळ देखील हळहळ देखील आहे. अवघ्या ५ हजारातून गुंतवणुकीला सुरुवात करून आज अब्जाधीश झालेल्या राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.