राज्यसभा निवडणुकीतून माघार? थोड्याच वेळात संभाजीराजेंची पत्रकार परिषद

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी संभाजीराजेंनी पत्रही लिहिलं. मात्र, सहाव्या जागेवर शिवसेनेने आपला उमेदवार दिला आहे. तर भाजप सुद्धा आपला उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता संभाजीराजे काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संभाजीराजे हे निवडणूक लढणार की अर्ज दाखल न करताच माघार घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संभाजीराजे या संदर्भात आज आपली भूमिका जाहीर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संभाजीराजे मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे काय घोषणा करतात हे पहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.