मासेमारीसाठी गेलेली नौका समुद्रात बेपत्ता, नौकेवर होते सहा खलाशी

मासेमारीसाठी गेलेली रत्नागिरीच्या जयगडमधील नौका समुद्रात बेपत्ता झाली आहे. नविद-2 या नौकेवर तांडेलसह सहा खलाशी आहेत. गेल्या पाच दिवसांपासून या नौकेशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेत.

नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी यांच्याकडून युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ हाती घेण्यात आले आहे. या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल असे खलाशी आहे. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत.

याआधी, बिहारमध्ये गंगा नदीत100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटून गेल्या वर्षी अपघात झाला होता. भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात ही दुर्घटना घडली होती. या बोटीमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील प्रवास करत होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवल्या होत्या. बोट उलटल्यानंतर काही प्रवाशी पोहत समुद्र किनारा गाठला होता. तर काही जण बेपत्ता होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.