विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन होणार

राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं अशक्य आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नये, असं उदय सामंत म्हणाले.

आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या.आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळं निकाल लवकर लागेल. राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे. 18 ते 25 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्याचं लसीकरण होणं गरजेचे आहे. लॉच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झालीय. ही भरती करणार आहोत. फक्त कोविड संकट कमी झाल्यावर होईल, प्राध्यापक भरती होणार नाही, अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये असं उदय सामंत म्हणाले.

तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले. एनसीसी व एनएसएसच्या प्रमुखांशी बोलणार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. संजय ओक यांनी तसं आवाहन केले होते. त्यांच्याशीही मी बोलणार आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन कमतरता नाही. लस व रेमडेसिव्हीरचं समान वाटप केंद्राने करावे, असं उदय सामंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.