केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजकारण सोडायची इच्छा? नागपूरमधील Video ने अनेकांच्या भुवया उंचावल्या

गेल्या काही वर्षांपासून राजकारणाचा स्तर घसरत चालल्याचे अनेकांनी कबूल केलं आहे. अगदी ग्रापंचायतपासून खासदार होण्यापर्यंत पाण्यासारखा पैसा ओतला जात आहे. मतदार ते आमदार, खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचेही चित्र आहे. नुकतेच महाराष्ट्रात झालेल्या संत्तातरातही घोडेबाजार झाल्याचे आरोप होत आहे. मात्र, यावर आता खुद्ध केंद्रीय मंत्र्यांनीच भाष्य केल्याने या गोष्टीला महत्त्व प्राप्त झालं आहे. हे केंद्रीय मंत्री दुसरे तिसरे कुणी नसून नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात थेट राजकारण सोडण्याची भाषा केली आहे. मात्र, त्यांना असं का वाटतंय? हे सजमून घेतलं पाहिजे.

सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रश्न उपस्थित केले. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले, असे मत केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी भाषणातून व्यक्त केली. ते ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे बोलत होते.

यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या कार्याचा गौरव केला. राजकारण सोडून अनेक गोष्टी केल्या जावू शकतात. हे गिरीश गांधी यांनी दाखवून दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून गिरीश गांधी यांचं मोलाचं कार्य आहे. गिरीश गांधी यांचं काम सुरू असताना आम्ही त्यांचे विद्यार्थी असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.