माकडांनी 4 महिन्यांच्या बाळाला बापाच्या हातातून हिसकावून तिसऱ्या मजल्यावरुन फेकलं, बाळाचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात माकडांची दहशत थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी माकडांच्या कळपाने वडिलांच्या हातातून 4 महिन्यांचे बाळ हिसकावले आणि छतावरून फेकले, ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. उष्णता जास्त असल्याने वडील मुलासह गच्चीवर फिरत होते. त्याचवेळी माकडांच्या कळपाने त्याच्यावर हल्ला केला आणि गोदीतील मुलाला हिसकावून फेकून दिले.

माकडांचा कळप टाळण्यासाठी वडिलांनी आवाज उठवला. मात्र, काही माकडे त्याला चिकटून बसली आणि घरचे लोक मदतीला आले तोपर्यंत आवाज ऐकण्यापूर्वीच माकडांनी त्याच्या हातातून बाळाला हिसकावून घेतले. यानंतर त्यांनी या बाळाला छतावरून फेकले. यानंतर तीन मजल्यांच्या छतावरून पडल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे कुटुंबीय गच्चीवर पोहोचले असता माकडांच्या झुंडीने त्यांच्यावरही हल्ला केला. दरम्यान, या बालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.

शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुनका येथील रहिवासी असलेल्या निर्देशच्या घरी सात वर्षांनी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. या बालकाच्या नामकरणाची तयारी सुरू होती. मात्र, निसर्गाला काही वेगळेच मंजूर होते. नामकरण सोहळ्यासाठी तारीखही निश्चित केली जात होती. मात्र, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यापूर्वीही शहरी भागात कुत्रे, माकडांच्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, जबाबदार अधिकारी नेहमीच खंत व्यक्त करण्याशिवाय काहीच करत नाहीत, अशी येथील परिस्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.