इंदूर-अमळनेर ST बसमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती; दुर्देवाने एकही बचावला नाही
आज सकाळी इंदूरमधील बातमीने अनेकांना धक्का बसला. मध्य प्रदेशातील इंदूरमधून निघालेली एसटी महामंडळाची बस तब्बल 40 प्रवाशांसह पुलावरुन खाली कोसळली. त्यावेळी पावसाचंही उधाण होतं. आणि पुलावरुन जाताना अख्ख्या बसने नर्मदेत जलसमाधी घेतली. जेव्हा या बसचा सांगाडा बाहेर काढण्यात आला तेव्हा ते दृश्य पाहून धक्काच बसला.दरम्यान या घटनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इंदूर-अमळनेरला जाणाऱ्या बस अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त हाती येत आहे. आतापर्यंत या बसमधून एकही जखमी प्रवासी सापडलेला नाही. बसमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं भिती व्यक्त केली जात आहे. या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. वेगवान कारला ओव्हरटेक करत असताना कदाचित नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली, असं धर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बाळासाहेब खिस्ते यांनी सांगितलं. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे.अरवा मूर्तुजा बोहरी (वय 27, रा. मूर्तिजापूर, अकोला, अमळनेरच्या माहेरवाशीण), बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (वय 45, रा. अमळनेर), बस वाहक प्रकाश श्रावण चौधरी (वय 40, रा. शारदा कॉलनी अमळनेर), निंबाजी आनंदा पाटील (वय 60, रा. पिळोदा, ता. अमळनेर), कमला निंबाजी पाटील (वय ५५, रा पिलोदा ता. अमळनेर) हे सर्व चौघही अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहे. अरवा मूर्तुजा बोहरी यांचं अमळनेरला माहेर आहे. त्यामुळे त्या इंदूरहून माहेरी जात असल्याचं सांगितलं जात आहे.
इंदोर-अमळनेर बस अपघात: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवराज सिंह चौहानांना फोन
मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे . एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अमळनेर ST बस दुर्घटनेसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.दुर्घटनेसंदर्भात सर्व मदत तात्काळ करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवण्यात येतील, असं शिवराज सिंग चौहान यांनी शिंदे यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली, तसंच मंत्र्यांना घटनास्थळी पाठवल्याची माहितीही शिंदे यांना दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची माहिती घेतली असून महाराष्ट्राकडून त्यांना योग्य ती मदत दिली जाणार आहे. विमानसेवाही उपलब्ध केली आहे, अशी माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंवर नाराजी बॉम्ब टाकत रामदास कदमांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, सेनेला आणखी एक हादरा
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. एकीकडे खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. तर दुसरीकडे आता, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी पत्र लिहून शिवसेनेबद्दल आपली नाराजीही बोलून दाखवली आहे.शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान सुरु
देशात 16व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यामध्ये देशातील लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रशासित प्रदेशांसह 28 राज्यांचे आमदार सहभागी होत आहेत. मात्र, असे काही लोक आहेत जे या निवडणुकीत मतदान करू शकत होते. परंतु, ते करू शकणार नाहीत. राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात आहे. मतांच्या मूल्याच्या दृष्टीने पाहिले तर एनडीएचे उमेदवार मुर्मू यांच्या विजयाच्या खूप आशा आहेत. कारण सत्ताधारी आघाडीशिवाय अनेक विरोधी राजकीय पक्षही त्यांना पाठिंबा देत आहेत.
या निवडणुकीत 776 खासदारांसह देशभरातील 4033 आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये खासदार आणि आमदारांच्या मताचे मूल्य वेगळे असते आणि वेगवेगळ्या राज्यांच्या आमदारांच्या मताचे मूल्यही वेगळे असते. एकूणच इलेक्टोरल कॉलेजचे एकूण मत मूल्य 1086431 आहे. यामध्ये ज्या उमेदवाराला 543,216 मते मिळतील, तो विजयी होईल.
कुत्र्याला दगडाला बांधून पाण्यात फेकले, गावातील टवाळखोर पोरांचा उपद्व्याप
भटक्या कुत्र्याच्या शेपटीला कधी फटाके लावणे, होळीमध्ये विनाकारण कुत्र्यांना रंग लावण्याचे प्रकार आजपर्यंत तुम्ही आम्ही पाहिले असतील. मात्र, चंद्रपूरमध्ये एका कुत्र्याच्या मानेला दगड बांधून पाण्यात फेकण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने दगड निसटला आणि कुत्र्याने सुटका करून घेतली.ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातली असल्याचे समोर आले आहे. काही तरुण हे गावातील एका नाल्याजवळ बसलेले होते. यावेळी या टोळक्याने एका कुत्राला पकडून धरले होते. या टोळक्यातील दोन तरुणांनी कुत्र्याच्या मानेला एक दोरी बांधली. त्यानंतर त्याच्या पोटालाही एक दोरी बांधली. या दोरीला भलामोठा दगड बांधण्यात आला. तोपर्यंत एक तरुणाने कुत्र्याला पाठीमागून धरून ठेवले होते.
चार दिवसात मंकीपॉक्सचे 2 रुग्ण! पाच जिल्ह्यांत हाय अलर्ट
भारतात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढलं असून अनेक राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. अशातच जगातील 76 देशांमध्ये दहशत पसरवणाऱ्या मंकीपॉक्सने आता भारतातही हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केरळमधील कन्नूर शहरात सोमवारी दुसरा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे. याआधी गुरुवारी केरळमधील कोल्लममध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना तर दुसरीकडे मंकीपॉक्स अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. राज्यातील पाच जिल्हे तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा आणि कोट्टायम या जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.
‘हे सरकार म्हणजे ‘एक दुजे के लिए’मधील वासू-सप्ना’; खासदारांच्या वृत्तानंतर राऊतांचा संताप
शिवसेनेतील 12 खासदार शिंदे गटामध्ये जाणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यासोबत काही खासदार उपस्थित होते.
आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदे गटासोबत हातमिळवणी केल्याचं वृत्त सूत्रांकडून सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या बैठकीला 12 शिवसेनेच्या खासदारांनी हजेरी लावल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक म्हणजे शिवसेनेचे 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहे. उद्धव ठाकरेंना आता खासदारांकडून दणका मिळाला आहे. नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे ही नव्या गटात जाणार असून नवा गटाचा प्रतोद पदी राहुल शेवाळे यांची केली जाणार आहे.
SD Social Media
9850 60 3590