केजरीवालांचा भाजपला हादरा; मध्य प्रदेशात खातं उघडून आपची दणक्यात एन्ट्री

मध्य प्रदेशातील सिंघरौलीमध्ये महानगर पालिकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. येथे महापौर निवडणुकीत आप पार्टीच्या उमेदवार विजयी झाल्या आहे. आपच्या रानी अग्रवाल यांनी भाजपच्या चंद्र प्रताप विश्वकर्मा यांना तब्बल 9352 मतांनी हरवलं आहे. ही जागा आधी भाजपच्या अखत्यारित होती. मात्र आपने भाजपच्या किल्ल्याला धक्का दिला आहे. यासह मध्य प्रदेशात आपची पहिली महापौर निवडून आली आहे.

सिंगरौलीच्या नवनियुक्त महापौर रानी अग्रवाल मारवाडी कुटुंबाशी संबंधित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या समाजकार्य आणि राजकारणात सक्रीय आहेत. रानी यांनी पहिली निवडणूक 2014 जिल्हा पंचायत सदस्य म्हणून लढली होती. यात त्यांना यश मिळालं होतं. रानी यांना जिल्हा पंचायतच्या अध्यक्षांइतके मतं मिळाले होते. मात्र ट्रायमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.

यानंतर 2018 मध्ये रानी या आपच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत उभ्या राहिल्या. मात्र याही वेळी खूप कमी मतांनी निवडणूक हरल्या. तेव्हापासून त्या या क्षेत्रात सक्रिय आहे. यंदाही आम आदमी पक्षाने दुसऱ्यांना महापौरपदासाठी उमेदवार उभा केला आणि यंदा त्यांना यश मिळालं. इतकच नाही तर या भागातून आपचे अनेक नगरसेवकही विजयी झाले आहेत.

निवडणुकीत उमेदवार घोषित केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे रोड शो केला होता. त्यांनी रानी अग्रवाल यांचा निवडणुकीत प्रचार केला होता. दुसरीकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष बीडी शर्मा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रोड शो केला होता आणि आपला उमेदवाराच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.