आज दि.१६ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

लोकशाही हॅक करण्यासाठी
सोशल मीडियाचा वापर : सोनिया गांधी

सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे . राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे.
आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सींकडून राजकीय कथानकांची मांडणी करण्याचं प्रमाण वाढत आहे,” असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत
वीज देण्यात येणार

पुढील 3 महिने या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच, थकबाकीपोटी कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय घेण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. आज पुन्हा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आणखी एक मोठी घोषणा केलीय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वीज देण्यात येणार आहे.

द कश्मीर फाइल्स बघण्यासाठी आसाम
सरकार देणार कर्मचाऱ्यांना सुट्टी

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक घोषणा केलीय. नुकत्याच प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीय. कू या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरुन केलेल्या पोस्टमध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना “हे सांगताना आनंद होतोय की आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना द कश्मीर फाइल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची सूट देण्यात आलीय.

रशियन फौजांनी युक्रेनमधील
५०० रुग्णांना बंदी बनवले

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही सुरुच आहे. दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून या युद्धात दोन्ही बाजूने मोठी जीवितहानी होत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियन फौजांनी युक्रेनमधील मारियोपोल या शहरातील एका रुग्णालयामध्ये तब्बल ५०० रुग्णांना बंदी बनवले आहे. रशियन सैनिकांकडून या रुग्णालयातून गोळ्या झाडल्या जात असून ओलिस ठेवलेल्या लोकांना रुग्णालयाच्या बाहेर पडणे अशक्य होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा
वन रँक वन पेन्शनला दिलासा

सशस्त्र दलातील वन रँक वन पेन्शन हा धोरणात्मक निर्णय असून त्यात कोणतीही घटनात्मक त्रुटी नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. केंद्राने २०१५ मध्ये संरक्षण क्षेत्रात वन रँक वन पेन्शन लागू केली होती. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने सांगितले की, वन रँक वन पेन्शन हा केंद्राचा धोरणात्मक निर्णय हा मनमानी नाही आणि न्यायालय सरकारच्या धोरणात्मक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही.

महाराष्ट्राचे प्रशासन म्हणजे
मुख्यमंत्र्यांचे आठवा अजूबा : मुनगंटीवार

काही पक्षांचे विचार एक्स्पायर झाले आहेत. तरी काही प्रमाणात ते निवडून येतात. पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स एक्स्पायर झाला असेल, तर त्यांच्या आसपासचे अधिकारी कसं काम करतात हे दिसून येतं. जर मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स काढला जात नसेल, तर सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

सिम्बॉल स्वतःला वाचवण्याचा
प्रयत्न करत आहेत : अधीर चौधरी

कपिल सिब्बल यांच्या विधानांना उत्तर देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “जेव्हा ते (कपिल सिब्बल) यूपीए सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा गोष्टी चांगल्या होत्या, आता यूपीए सत्तेत नसल्यामुळे त्यांना वाईट वाटत आहे.” G-23 सदस्यांपैकी कपिल सिब्बल अलीकडच्या काळात पक्ष नेतृत्वाच्या (गांधी परिवार) विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांना सत्तेबाहेर राहण्याची सवय नाही. त्यामुळे ते टीका करून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा काँग्रेस नेते कपिल सिब्बल काय जनधार आहे हे माहीत नाही.”

नारायण राणे, नितेश राणे
यांना जामीन मंजूर

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मंत्री नारायण राणे तसेच भाजप आमदार नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे नितेश राणे यांनी स्वागत केले असून यापुढेही जिथे अन्याय होईल तेथे आम्ही आवाज उठवणार असं त्यांनी म्हटलंय.

समाजवादी पार्टीच्या पराभवाने
निराश कार्यकर्त्याची आत्महत्या

विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचा पराभव झाल्याने निराश झालेल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आज आत्महत्या केली. त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्येच प्रयत्न केल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, मात्र त्यापूर्वीच या कार्यकर्त्याच्या मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
४० वर्षीय देवेंद्र यादव बबलू असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली.

कलावंतांबद्दल हेमामालिनी यांनी
लोकसभेत व्यक्त केली चिंता

भारत आपल्या संस्कृती आणि सांस्कृतिक वारशामुळे जगभरात सर्वोत्तम आहे. आपली कला, संस्कृती आणि कलाकार हा त्याचा आधार आहे. ज्या कोणत्या देशाने आपल्या कलाकारांची उपेक्षा केली आहे, तिथे फक्त घसरण झाली आहे. कला क्षेत्र आणि कलाकार समस्यांना तोंड देत आहेत. एक कलाकार म्हणून मला त्यांची काळजी वाटते.” असं भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी आज लोकसभेत म्हटलं.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.