भारतात दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत प्रदूषणात कमालीची वाढ झालीय. 2018 पासून वायू प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी एअर फिल्टरिंग (air filtering)साठी तब्बल 76 कोटी रुपये केंद्र सरकारने भारतभरात दिलेत. या निधीतला जास्त हिस्सा हा दिल्ली राज्यासाठी देण्यात आला होता. मात्र आजमितीस यातील किती रक्कम वापरली याबाबत सरकारनं काहीही ठोस पुरावे दिलेले नाहीत. ऑक्टोबर 2021 महिन्यातसुद्धा PM (particulate matter in air) ची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहेत. भारतात दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त आहे आणि सरकार या संकटाविरोधात मार्ग काढण्यात अयशस्वी ठरत आहे.

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते 2018 मध्ये “वायू” या प्रकल्पाअंतर्गत बाह्य प्रदूषण नियंत्रण (Outdoor Pollution Control) प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. मात्र अनेक तज्ज्ञांकडून या हवा शुद्धीकरण प्रकल्पाला नामंजुरी देण्यात आली आणि त्याला भव्य व्हॉक्यूम क्लीनर्सशी तुलना करण्यात आली.

वायू प्रोजेक्ट हा निरी (NEERI) आणि आयआयटी मुंबईने तयार केला आहे आणि हे फिल्टर्स वायू प्रदूषणातील धोकादायक कार्बन मोनो ऑक्साईड PM 2.5 आणि PM 10 ला कार्बन डाय ऑक्साईडमध्ये रूपांतरीत करते, ज्याने ट्रॅफिक जंक्शनवरील प्रदूषण 40 ते 60 टक्क्यांनी कमी होईल. यासाठी 36 कोटी दिले होते असे वृत्त आहे.

यानंतर जानेवारी 2020 मध्ये पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी त्यांच्या फाऊंडेश द्वारे लाजपत नगर मार्केटमध्ये एक भव्य एअर प्युरिफायर लावले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक एअर प्युरिफायर लावले. हे प्युरिफाअर्स त्या भागात 1000 स्क्वेअर मीटर परिसरात 1 लाख क्युबिक मीटर शुद्ध वायू देईल, असं त्यांनी सांगितलं होतं. यासारखे भव्य एअर प्युरिफायर्स दिल्लीच्या कॅनोट प्लेस आणि आनंद विहारमध्ये देखील बसवलेले आहेत. मात्र हे प्रक्लप वायू प्रदूषणाविरोधात किती प्रभावी आहेत, यासाठी संशोधक आणि तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केलेत.

दिल्लीत 2020 मध्ये PM 2.5 ची पातळी साधारण पातळीपेक्षा नऊ पट जास्त नोंद झाली. ह्या वायूच्या कणांमुळे श्वास आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते. तर PM 10 हे धोकादायक वायूचे कण धुळीमुळे निर्माण होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.