बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेते या जगात नाहीत, पण त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आणि कथा आजही आठवल्या जातात. अभिनेता संजीव कुमार हे हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते होते. संजीव कुमार यांनी कॉमेडीपासून गंभीरपर्यंत सर्व प्रकारची पात्रे अत्यंत सहजतेने साकारली. त्यांचा पडद्यावरचा अभिनय पाहून सगळेच त्यांचे चाहते झाले, तर आपल्या मनमोहक हास्याने त्यांनी मुलींना देखील वेड लावले होते.
अंजू महेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हाही संजीवचे नाव एखाद्या मुलीशी जोडले जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जवळचे मानणारे लोक म्हणायचे, ‘अरे यार, ही तुमच्या पैशाच्या मागे आहे.’ असे सांगून त्यांना नेहमी भडकावले जायचे आणि नंतर तर त्यांच्या मनाने हे स्वीकारलेच होते. त्या म्हणतात मी त्यांना म्हणाले देखील की, ‘तू वेडा आहेस, तू स्वतः पडताळणी करू शकत नाहीस का की, ती तुझ्या मागे पैशासाठी आहे का? जर तू असा विचार करत राहिलास, तर तू कधीही लग्न करू शकणार नाहीस’.
अंजू म्हणाल्या की, ‘मला माहित नाही की ते कोणाच्या प्रेमात पडले होते की, कोणी त्यांच्या प्रेमात पडाले होते. पण हो त्यांच्या आजूबाजूला नेहमीच मुली होत्या. ते एक अतिशय गोड व्यक्तीमत्त्व होते आणि एक सुंदर स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर होते. मुली त्याचे मन जिंकण्यात व्यस्त होत्या. काहीजणी त्यांना जेवणाचे डबे पाठवत असत तर काही जणी त्यांच्या प्रेमात पडल्याच होत्या. मात्र, ते आता स्वतःच हे मान्य करून बसले होते की सर्व मुली त्यांच्या मागे त्याच्या पैशांसाठी आहेत आणि शेवटी ना त्यांच्याकडे घर होतं ना पत्नी.’
संजीव कुमार यांना हेमा मालिनी खूप आवडायच्या. त्यांचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण, धर्मेंद्रने हेमाला आपले बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती, तर हेमा देखील धर्मेंद्रच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यानंतर हेमाने संजीव यांचा प्रस्ताव नाकारला. नंतर संजीव यांचे नाव देखील सुलक्षणाशी जोडले गेले होते, पण त्यांनी सुलक्षणाशी लग्न केले नाही. त्याचबरोबर सुलक्षणाही आयुष्यभर आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
संजीव कुमार यांचे वयाच्या 47व्या वर्षी 1984 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजीव कुमार यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. संजीव कुमार यांना नेहमी भीती वाटत होती की, ते लवकरच जगाचा निरोप घेतील, या मागे त्याच्या मनात एक भीती होती जी त्यांच्या मनात कायम स्वरूपी स्थिरावली होती आणि ती खरी ठरली.