देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यास हे राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे उच्च,तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पुण्यातील बावधन इथल्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने नवीन तयार करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक संजय चोरडिया ,सुषमा चोरडिया आणि विदयार्थी उपस्थित होते.
आज अब्दुल कलाम यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्धाटन माझ्या हस्ते होणे आणि त्यांच्या नावाखाली माझे नाव जोडले गेल्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. आपल्यात काही मतभेद झाले तरी माझं नाव काढून टाकू नका. राजकारणात सत्ता गेली की नावही जातं. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नावानं उद्घाटन होत असलेल्या सभागृहातून ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ घडावेत, असं उदय सामंत म्हणाले. मला त्यांना वैयक्तिकरित्या भेटण्याचा योगही आला होता. आणि आज आलेला योग हा दुग्धशर्करा योग आहे .तसेच देशातील पहिले सायबर विदयापीठ महाराष्ट्रात होईल याकरता मी प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले
पहिल्या दिवशी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांचा तुरळक प्रतिसाद मिळाला यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले राज्यातील प्रमुख शहरात महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. मी स्वतः विद्यार्थ्यांची महाविद्यालयात जाऊन जनजागृती करतोय. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याचं काम केलं जातंय. सध्या तरी दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच सध्या तरी प्रवेश मिळणार कारण ही नियमावली केंद्र सरकारची आहे, असंही उदय सामंत म्हणाले.