रुपयाची घसरण! अर्थमंत्री सीतारामन म्हणतायेत तो मजबूत होतोय?
वाढती महागाई आणि बाजारात सध्या सुरू असलेली अस्थिरता, मंदीमुळे लोक चिंतेत आहेत. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. आता एका डॉलरच्या तुलनेत आता रुपयाची किंमत ही 82.69 इतकी झाली आहे. तर अर्थतज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाची सततची कमजोरी आर्थिक विकास दर आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही. पण अमेरिका दौऱ्यात पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात वेगळेच उत्तर दिले.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जर तुम्ही जगातील इतर देशांच्या चलनावर नजर टाकली तर तुमचा रुपया त्याच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. ते ‘इमर्जिंग मार्केट करन्सी’बद्दल बोलल्या. याचा अर्थ जे देश विकासाकडे वाटचाल करत आहेत, त्यांचा रुपया त्या सर्व देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे.
नेदरलँडची विजयी सलामी, श्रीलंका वर्ल्ड कपमधून होणार आऊट?
आधी नामिबिया आणि त्यानंतर नेदरलँडनं यंदाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेत विजयी सलामी दिली. नेदरलँडनं क्वालिफाईंग फेरीच्या दुसऱ्या सामन्यात यूएईचा 3 विकेट्सनी पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयाचा आटोकाट प्रयत्न केला. पण अखेर नेदरलँडनं विजयी लक्ष्य गाठून स्पर्धेतला पहिला विजय साजरा केला. एकूणच स्पर्धेतला पहिला दिवस रोमांचक ठरला. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेनं नामिबियासमोर गुडघे टेकले आणि त्यानंतर यूएईला नेदरलँडनं सहज हरवलं. त्यामुळे या चार संघांपैकी सुपर 12 च्या तिकिटासाठी नामिबियापाठोपाठ नेदरलँडनंही आपला हक्क सांगितला आहे. याचा अर्थ श्रीलंकन संघाची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.
शरद पवारांच्या एका पत्रकार परिषदेने महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? फडणवीसांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केलीय. ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज देखील सादर केला आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मत आहे. त्यांनी याबाबतचं पत्र भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पाठवलं. राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील तीच भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
“मला एक स्टेटमेंट द्यायचं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही निवडणूक साधारणत: दीड वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्देवी निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणूक लढवत आहेत. तसेच भाजपचे पटेल यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्याप्रसंगी मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली की गोपीना मुंडे यांच्या परिवारातील कुणी उमेदवार उभा राहत असेल तर आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार उभा करणार नाही. आम्ही तसा निर्णय देखील घेतला. मला प्रामाणिकपणे वाटते रमेश लटके यांचं योगदान आणि या जागेचा कालावधी पाहता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणे योग्य होईल. व महराष्ट्रात योग्य संदेश जाईल. यासाठी निवडणुकीची कोणतीही प्रतिक्षा न करता महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, असं सर्व संबंधितांना मी आवाहन करतो”, असं शरद पवार म्हणाले.
पुण्यात शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला अन् पाहतापाहता…, सात ते आठ गाड्यांचं प्रचंड नुकसान
पुण्यात महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात ते आठ गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्व जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड खळबळ उडाली. अपघातामुळे परिसरात काहीवेळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली. पण स्थानिक नागरीक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतून सुरळीत करण्यात आली. खरंतर काळाजाचा अतिशय थरकाप उडवणारी ही घटना होती. सुदैवाने ही घटना थोडक्यात निभावून गेली. या अपघातात फार मोठी जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण नक्की होतं.
संबंधित घटना ही पुण्यात पाषाण-सुस परिसरात भीषण अपघाताची घटना घडलीय. पाषाण-सुस रोडवर शिवशाही बसचा ब्रेकफेल झाल्याने ही बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेलं. त्यामुळे ही बस थेट पुढे असलेल्या दुचाकीला जोराची धडकली. बस भरधाव होती. त्यामुळे पुढची कार त्या पुढच्या कारला धडकली. अपघाताची ही मालिका एका मागेएक अशा सात ते आठ गाड्यांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे अतिशय शून्य मिनिटात डोळ्यांवर मिटलेली पापणी उघडण्याआधी जितका कमी कालावधी लागतो अगदी तितक्या वेळात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका दुचाकीचं देखील नुकसान झालं आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरेंचा फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रमेश केरे यांनी तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले आहे.रमेश केरे यांनी आज फेसबुकवर लाईव्ह येऊन आपण आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले.गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला असा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
‘औषधांच्या प्रिस्क्रिप्शनवर श्री हरी लिहा’, मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना का दिला असा अजब सल्ला?
तुम्ही डॉक्टरांनी दिलेलं औषधांचं प्रिस्क्रिप्शन पाहिलं असेल तर त्यात काही शब्द मेडिकल टर्म किंवा वैद्यकीय कोड असतात. ज्याबाबत सामान्य माणसांना फार माहिती नसते. तसंच डॉक्टर रुग्णांना प्रिस्क्रिप्शनमध्ये जे लिहून देतात ती त्यांची लिखाणाची भाषासुद्धा तशी सामान्यांना समजत नाही. याच प्रिस्क्रिप्शनवर आता मुख्यमंत्र्यांनी श्री हरी लिहिण्याचा अजब सल्ला डॉक्टरांना दिला आहे.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना हा अजब सल्ला दिला आहे. एमपीचे सीएम मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डॉक्टरांनी मेडिकल प्रिस्क्रिप्शनवर श्री हरी लिहावं असं सांगितलं आहे. त्यांचा हा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात ते डॉक्टरांना हिंदीतून प्रिस्क्रिप्शन देण्यास सांगत आहेत.
SD Social Media
9850 60 3590