राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर वेगवेगळे दावे केले जात आहे. शिवेसेनेकडून राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाला, असा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या दाव्यावर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी टीका केली आहे. दुसऱ्याने केला तो घोडेबाजार आणि तुम्ही केलात तो काय भेंडीबाजार? असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला.
“घोडेबाजार झाला…घोडेबाजार झाला… बांग मारणारे संजय राऊतजी, मनसेचे नगरसेवक पळवताना करोडोचा घोडेबाजार केलात हे अवघा महाराष्ट्र जाणतो. दुसऱ्याने केला तो घोडेबाजार आणि तुम्ही केलात तो काय भेंडीबाजार”, असा घणाघात यशवंत किल्लेदार यांनी केला.