गॅस सिलेंडरच्या कनेक्शनमध्ये
प्रति सिलेंडर ७५० रुपयांनी वाढ
पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. रेग्युलेटरसाठी २५० रुपये खर्च करावे लागतील.
देशातील पहिली खासगी रेल्वे
गुरुवारी शिर्डीला पोहोचणार
भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे सेवेला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली असून गुरुवारी शिर्डीतील साई नगरला पोहोचेल. या स्पेशल ट्रेनमध्ये १५०० लोक प्रवास करू शकतात. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी गुग्नेसन यांनी ही माहिती दिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, त्यांनी सांगितले की, रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला २ वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरने कोचच्या जागांचे नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन ट्रीप केल्या जातील. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच असे एकूण २० डबे आहेत.
एकीकडे ईडीचा समन्स, दुसरीकडे अनिल परबांची साईचरणी धाव
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावल्यानंतर त्यांनी साई चरणी धाव घेत साई मंदिरातील मध्यान आरतीला हजेरी लावली. “मला काल नोटीस आली पण मी मुंबईत नव्हतो. मला जेव्हा-जेव्हा ईडीकडून बोलवलं जाईल, त्यावेळी मी जावून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देईन. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी का देऊ?” असा सवालही अनिल परबांनी साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना केला.
अलिबागमध्ये PNP नाट्यगृहात अग्नितांडव
अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. पीएनपी नाट्यगृहाला आज संध्याकाळी आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप घेत नाट्यगृहाला विळखा घातला. संपूर्ण नाट्यगृहात आगीचा भडका उडाला आहे. त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट दिसून येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्ठळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते, त्यामुळे ही घटना घडली, असं सांगितलं जात आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मरण राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर खरमरीत टीका
दोन टप्यातील एफआरपी त्याकरिता त्याच गळीत हंगामातील रिकव्हरी व त्या रिकव्हरीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे लेखापरिक्षण या त्रिकुटात कायदेशीररित्या ऊस उत्पादकांना अडकवून “सरकारचे धोरण त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मरण” अशी महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाच्या चिपाडासारखी अवस्था करून ठेवली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कार्यालयातील पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
जून महिन्यातही पावसाची रखडपट्टी सुरूच?
पावसाच्या आगमनानंतर ही मान्सूनची रखडपट्टी अजूनही सुरूच आहे. हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला का असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय.
राहुल गांधींची ईडी चौकशी सुरूच, ED विरोधात आंदोलन करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून गांधी कुटुंबीयांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. सोमवारपासून राहुल गांधींची ईडी चौकशी करत आहेत. राहुल गांधींच्या चौकशीचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान सोमवारी ईडीच्या कारवाईविरोधात संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अशाच प्रकारे नागपूर येथीही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्याची जीभ घसरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली.
अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी
जागा मागणार : आदित्य ठाकरे
शिवसेना नेते व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अयोध्येत पत्रकारपरिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही, इथे राजकारण करायला आलेलो नाही, दर्शन घ्यायला आलो आहे. असं सांगितले. तसेच, अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. पत्रकार परिषदेस शिवसेना नेते संजय राऊत, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची देखील उपस्थिती होती.
आसाम रायफल्स भरतीमध्ये
अग्निवीर सैनिकांना प्राधान्य
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र असे असताना केंद्रासह अनेक राज्य सरकारांनी अग्निपथ योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या अग्नीवीरांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये अग्निवीर सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या योजनसंदर्भात आता हरिणाया सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यपालांना
घर बदलण्याची ऑफर
भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या नव्या निवासस्थानाचं कौतुक केलं. ‘या वास्तूचं जसं नुतनीकरण झालं, तसं जल भूषण जिकडे आपल्या राज्यपालांचं निवासस्थान आहे,’ असं म्हणत उद्धव यांनी राज्यपालांकडे पाहून पुढे, “फार मोठं आणि खूप चांगलं घर बांधलंय तुम्ही” असं म्हटलं. यानंतर सभागृहामध्ये एकच हसू फुटलं. पुढे उद्धव यांनी, “एक्स्चेंज करायचं का?” असंही मिश्कीलपणे विचारलं. यानंतरही सभागृहातील उपस्थित मान्यवर हसू लागले. बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजभवनातील दालन हे प्रेरणादायी तीर्थस्थळच ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर
बरोजगारांच्या दरात घट
मागील जवळपास दोन वर्षाहून अधिक काळापासून भारतासह जगभरात करोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. तर लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता देशात रोजगार वाढल्याचं चित्र आहे. बरोजगारांच्या दरात घट झाल्याचं एका सरकारी अहवालात म्हटलं आहे.
सुनील छेत्री फुटबॉलमध्ये सर्वाधिक
गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. सुनील छेत्रीने मंगळवारी १४ जूनला हाँगकाँगविरोधात एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हा रेकॉर्ड केला. या सामन्यात सुनील छेत्रीने ८४ वा गोल केला. यासोबतच सुनील छेत्रीने रिअल मॅड्रिडचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलर फेरेंक यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. सुनील छेत्रीने याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकलं आहे.
मालेगाव मध्ये महाकाय
वटवृक्षाचे पुनर्रोपण
विकास आणि पर्यावरण यांच्या संघर्षात पर्यावरणाचीच कायम हानी होत असताना मालेगाव महापालिकेने विकास करतानाच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा चंग बांधून महाकाय वटवृक्षावर कुऱ्हाड चालविण्याऐवजी त्याचे पुनर्रोपण करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. महापालिकेच्या या प्रयोगास कृषिमंत्री दादा भुसे यांचीही भरभक्कम साथ लाभली. या प्रयोगाचे वृक्षप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.
SD social media
9850 60 3590