राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यातच आता राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक कड्यावर चढायचा प्रयत्न करत होते. त्यामुळे या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे.
पर्यटकांना पोलिसांचा चोप –
राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. राधानगरी तालुक्यातील हा प्रसिद्ध असा धबधबा आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येतात. यापैकी काही जण धबधब्याच्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते. निसरट झालेल्या या कड्यावर चढताना जीवावर बेतू शकते, त्यामुळे पोलिसांनी या पर्यटकांना चांगलाच चोप दिला.