पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत मोदी सभाही घेत आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी त्यांचे चाहतेही रस्त्यावर आले आहेत. बऱ्याच ठिकाणी मोदी… मोदी… मोदी…. असा नारा ऐकायला मिळतो आहे. नागरिकांचं आपल्यावरील प्रेम पाहून पंतप्रधान मोदी इतके भारावले की ते नागरिकांना थेट भेटण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी आपलं सुरक्षा कवच सोडलं आण नागरिकांना भेटण्यासाठी ते थेट रस्त्यावर आले. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पंतप्रधान मोदी सामान्य नागरिकांना भेटण्यासाठी रस्त्यावर उतरलेला हा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मोदी आपल्या आलिशान आणि सुरक्षित अशा गाडीतून बाहेर आलेले दिसत आहेत. गाडीचा दरवाजा उघडून ते उभे आहेत. लोक थेट त्यांच्या जवळ येत आहेत आणि त्यांना हात जोडत प्रणाम करताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत. मोदीसुद्धा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत आहेत. दूर असलेल्या लोकांना हात दाखवत आहेत.
यानंतर मोदी आपल्या गाडीतूनच बाहेर येत. सुरक्षा वगैरे सर्वकाही विसरून ते नागरिकांपर्यंत पोहोचतात. तिथं दुसरा नागरिक येतो जो पंतप्रधानांच्या हातात त्यांचा काढलेले स्केच देतो. मोदी यावर आपला आॕटोग्राफ ही देतात आणि त्या व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवून तिथून निघताना दिसतात.
मोदींचा हा व्हिडीओ जामनगरमधील आहे. जिथं मोदी नागरिकांच्या प्रेमापोटी आपल्या कारमधून बाहेर पडत, सुरक्षेची पर्वा न करत रस्त्यावर उतरलेले दिसले.
कशी असते पंतप्रधानांना मिळणारी सुरक्षा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष संरक्षण गट (SPG) संरक्षण देण्यात आलं आहे. संसदेने या संदर्भात कायदा देखील केला आहे, ज्यामध्ये केवळ देशाच्या पंतप्रधानांनाच SPG संरक्षण दिले जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. SPG म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप देशाच्या पंतप्रधानांचे संरक्षण करतात. एसपीजीचे कमांडो इतके वेगवान आणि चपळ आहेत की पंतप्रधान जिथे जातात तिथे प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवून असतात. पंतप्रधानपद सोडल्यानंतर 5 वर्षे एसपीजी सुरक्षा असेल आणि नंतर ती काढून घेतली जाईल.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ताफ्यात आणखी एका नव्या वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही अभेद्य किल्ल्याप्रमाणे या कारमध्ये अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत ज्या शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडण्यास सक्षम आहेत. या गाडीची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे.