त्रिपुरात ६० पैकी ३४ जागांवर भाजपा आघाडीवर, तर टीएमपी आणि टीएमसी

ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झालं होतं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहे. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी ( एनडीपीपी ) आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टी ( एनपीपी ) आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.

त्रिपुरात भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ६० पैकी ३४ जागांवर भाजपावर आघआडीवर आहे. तर, टिपरा मोथा पार्टी ( टीएमपी ) ५ जागांवर तर तृणमूल काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.