भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव (वय-७५) आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. वडील बेपत्ता झाल्याचं समजताच क्रिकेटपटू केदार जाधवने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काल सायंकाळी पावणे चारच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव हा पुण्यातील कोथरूड भागात आपल्या कुटुंबासमवेत राहतो. काल त्याचे वडील महादेव जाधव हे कोथरुड सिटी प्राईड परिसरातून बेपत्ता झाले आहेत. बराच वेळ उलटूनही वडील घरी परत आले नाहीत. त्यांच्याजवळ फोनही नाही.वडिलांशी कुटुंबियांचा कसलाही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे केदार जाधवने अलंकार पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.