बुलडाणाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. चिखली तालुक्यासह बुलडाणा आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि हरभरा घेऊन त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष रनमोडे असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रानमोडे याच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित शेतकरी सुनील मोडेकर यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु होता. या दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या संतोष रनमोडेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.पोलिसांनी रानमोडेकडून 42 लाख नगदी रोख रक्कम आणि किया सेलटॉस गाडी जप्त केली आहे.