ऑडिओ क्लिपनंतर देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अखेर मौन सोडलं आहे. तीन दिवसांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, हे मानसिक उद्विघ्नेतून लिखाण केले आणि नंतर त्याची ऑडिओ क्लिप तयार केली. मात्र ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल केल्याचा दावा ज्योती देवरे यांनी केला.

ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल झाल्यामुळे जास्त डिप्रेशन आलं आणि 2 दिवस फोन बंद ठेवला, असं ज्योती देवरे यांनी सांगितलं. मात्र आता जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणं झालं असून मी पूर्णपणे स्टेबल असल्याचं ज्योती देवरे यांनी म्हटलं.

अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष याबाबत सविस्तर कथन केलंय.

विशेष म्हणजे या महिला तहसिलदारांनी लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाविषयी देखील या ऑडिओ क्लिपमध्ये माहिती दिलीय. या महिला तहसिलदारांची ऑडिओ सध्या चांगलीच व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केलाय. या अहवालात महिला तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.