पुण्यातील व्यापारी म्हणतात नियम पाळू, पण दुकाने उघडू द्या

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती व्यापारी समाजाने (Traders) केली आहे. बाजारपेठा खुल्या करण्यासाठी कोणती नियमावली असावी, याचा प्रस्ताव आम्ही सरकारला देऊ. त्यानंतर सरकारशी चर्चा करुन अंतिम नियमावली ठरवता येईल. पण सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवल्यास व्यापाऱ्यांचे हाल होतील, असे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी म्हटले. त्यामुळे ठाकरे सरकार 1 जुनपासून दुकाने उघडण्यासाठी परवानगी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जुनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जुनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली होती.

व्यापाऱ्यांनी यापूर्वी 15 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यास विरोध केला होता. मात्र, मुंबई वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांची ही मागणी मान्य केली नव्हती. त्यामुळे राज्यातील व्यापारी समाज नाराज झाला होता. मात्र, कोरोना आणि म्युकरमायकोसिस या दुहेरी संकटामुळे ठाकरे सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.