साड्या, कुर्तीज, दागिने, राखी,टेबलमॅटस्, बेडशीटस्, फूटवेअर खरेदीची संधी
संपूर्ण भारतातील 70 पेक्षा अधिक नामांकित विक्रेत्यांचे एकाच छताखाली प्रदर्शन म्हणजेच ’कल्पनिती राखी व लाईफस्टाईल एक्झिबिशन’ जळगाव शहरात पुनश्च एकदा भरविले जात आहे. शहरातील आकाशवाणी चौकाजवळील लाडवंजारी वातानुकुलीत सभागृहात गुरूवार दि. 14 व शुक्रवार दि. 15 जुलै 2022 असे दोन दिवस भरविण्यात येणार्या या प्रदर्शनात सावन महिन्यात येणाऱ्या सर्व सणांना लागणार्या विविध श्रृंगाराच्या वस्तूंची शृंखला ग्राहकांना एकाच छताखाली खरेदीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. यामध्ये साड्या, कुर्तीज, दागिने, राख्या, बेडशीटस्, फूटवेअर, हस्तनिर्मित आणि केसांपासून बनविलेल्या वस्तू, विविध उपकरणे आणि पाऊच यासह बर्याच शृंखलांचा समावेश आहे.
देशातील मुंबई, कोलकता, दिल्ली, बडोदा, सुरत, काश्मीर, अमरावती, इंदूर, बेंगळुरू, अकोला, हैदराबाद, नागपूर, रायपूर, नाशिक, पुणे, जयपूर, वाराणसी आणि इतर बर्याच ठिकाणच्या प्रसिद्ध असलेल्या विविध वस्तूंच्या शृंखला ग्राहकांना एकाच छताखाली खरेदी करता येतील. 14 व 15 जुलै 2022 असे दोनच दिवस भरविल्या जाणार्या प्रदर्शनात ग्राहकांना विविध नामांकित ब्रँडच्या आकर्षक वस्तू खरेदी करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे. त्यामुळे जळगावकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन मनपसंत वस्तू खरेदीचा आनंद घ्यावा, असे कल्पनितीच्या आयोजकांनी कळविले आहे.