7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन केले उत्तीर्ण, शिक्षक पात्रता परीक्षेचा घोळ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रकरणाचा तपास करत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केला. परीक्षा परिषदेने2018 मध्ये झालेल्या 500 अपात्र विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 50-60 हजार रुपये घेतल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेकडून जिल्ह्यानुसार टीईटीची परीक्षेची आकडेवारी मागवली आहे. परीक्षा परिषदेकडून आकडेवारी देण्यास टाळाटाळ करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. येत्या आठ दिवसात आकडेवारी न दिल्यास परिषदेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे . घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स अपवर पाठवित होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

टीईटीमध्ये 7800 अपात्र उमेदवार पात्र ठरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे आणखी लोकांना यामध्ये अटक होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात वेगवेगळया ठिकाणाहून आतापर्यंत 40 आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामधील काहीआरोपी यातील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरतीमध्येही सहभागी आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने कर्मचारी कामावर नव्हेत. त्यामुळे तपासही थंडावला होता. मात्र पुन्हा तपासाची चक्रे वेगवान झाली आहेत.

सायबर पोलीसांच्या तपासात निष्पन्न सात हजार आठशे शिक्षक बोगस पद्धतीने भरती झाल्याचं उघड झाले आहे. हे सात हजार आठशे शिक्षक जर सेवेत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना पदमुक्त केली जाईल. 2013 पासून टी ई टी परिक्षेत घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे राज्यभरातून शिक्षकांची सर्टीफिकेट पडताळणीसाठी मागविण्यात आली आहेत. आतापर्यंत 6 हजार सातशे सर्टीफिकेट जमा झालीयत. अजून नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेची आकडावारी यायची आहे.

या सात हजार सातशे शिक्षकांपैकी जे शिक्षक बोगस पद्धतीने भरती झाले असतील त्यांना पदमुक्त केले जाईल आणि फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे 10 कर्मचारी सध्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन सायबर पोलीसांना मदत करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगतात यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.